मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये परीक्षेचा काळ सुरू असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षकांना मतदार यादीच्या कामाला जुंपले आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रातील कामे तसेच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवणार कसे, त्यांना कोण शिकवणार असा संतप्त सवाल शिक्षकांनी केला आहे.
२५ मार्चला घाटकोपर, मानखुर्द आणि अंधेरी, बोरिवली मधील शिक्षकांना निवडणूक कामांसाठी नियुक्ती आदेश दिले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून १९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार एसआयआर कार्यक्रम १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी २००२ मधील अंतिम यादीतील मतदारांची २०२४ मधील मतदार यादीशी (मॅपिंग) जुळणी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
ही कामे करावी लागणार; प्रशासनाचे आदेश
जारी मतदार यादीतील ब्लर फोटो, दुबार नोंदी, मयत मतदारांची पडताळणी, फॉर्म ७-८ प्रक्रिया आणि मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण ही कामे ठरावीक मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. घाटकोपर विधानसभा मतदारसंघ मतदान नोंदणी अधिकारी मनीषा मोहिते तसेच मानखुर्द विधानसभा मतदारसंघ मतदान नोंदणी अधिकारी जयराम पवार यांनी आपल्या भागातील सर्व पालिका शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर होण्याचे आदेश दिले.
शिक्षकांची भूमिका काय?
पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांनी सांगितले की, याआधीच बीएलओ कामासाठी अनेक शिक्षकांना नेमण्यात आले होते. आता पुन्हा पुर्नपरीक्षणाच्या कामासाठी नियुक्त्तीचे आदेश दिल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. 'विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा?' अशी चिंता शिक्षक आणि मुख्याध्यापकांपुढे उभी राहिली आहे.
मुलांचे होईल नुकसान
मानखुर्द, गोवंडी घाटकोपरसारख्या भागात विद्यार्थी संख्या प्रचंड आहे. सकाळच्या सत्रात ६०० विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक उपलब्ध राहणार असल्याने शालेय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Web Summary : Mumbai teachers are assigned election duty during crucial exams, raising concerns about students' education. With teachers diverted, schools face staff shortages, especially impacting students in areas like Mankhurd and Ghatkopar, potentially disrupting their learning.
Web Summary : मुंबई में परीक्षा के दौरान शिक्षकों को चुनाव ड्यूटी पर लगाया गया, जिससे छात्रों की शिक्षा पर चिंता बढ़ गई है। शिक्षकों के हटने से स्कूलों में कर्मचारियों की कमी हो जाएगी, जिससे मानखुर्द और घाटकोपर जैसे क्षेत्रों के छात्र प्रभावित होंगे, जिससे उनकी पढ़ाई बाधित हो सकती है।