Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून आज भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 07:41 IST

महाविकास आघाडी व भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादांमध्ये कंबोज ते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, नवाब मलिक  यांच्यावर आरोप करीत आहेत.

मुंबई : भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ (प) येथील खुशी प्राईड ब्लमोडो इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे बुधवारी त्याची तपासणी करण्यात  येणार आहे. महापालिकेच्या एच/पश्चिम विभागाने सोमवारी  त्याबाबत नोटीस बजावली आहे.महाविकास आघाडी व भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादांमध्ये कंबोज ते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, नवाब मलिक  यांच्यावर आरोप करीत आहेत. मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांनी तलवार फिरवत मिरवणूक काढली. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिका नियमानुसार सांताक्रूझ येथील एसव्ही रोडवरील इमारतीबद्दल नोटीस  बजावली आहे. तर याबाबत कंबोज यांनी आपण झुकणार नाही, कर नाही, त्याला डर कशाला, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका