मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गुरुवारी शहरातील विविध भागांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसली. दुबार मतदान रोखण्यासाठी उद्धवसेना आणि मनसेकडून सुमारे दोन हजार 'भगवा गार्ड' तैनात करण्याची योजना आखण्यात आली होती. प्रत्यक्षात मुंबईच्या गल्लीबोळांत भाजप आणि शिंदेसेनेचेच 'भगवा गार्ड' अधिक सक्रिय असल्याचे चित्र होते.
शिंदेसेना आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्या भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून वावरताना आढळल्या. काही ठिकाणी उमेदवाराचा क्रमांक पांढऱ्या टी शर्टवर भगव्या रंगात छापल्याचे टी-शर्ट परिधान करून कार्यकर्ते दिसत होते. अशा प्रकारचे टी शर्ट घालून कार्यकर्ते आपापल्या प्रभागात बाईकवरून फेऱ्या मारतानाही आढळले.
भाजपच्या काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांना भगव्या रंगाचे टी शर्ट दिले होते. तर, नाश्ता, भोजन आणि चहा-व्यवस्था पाण्याची उमेदवारांकडून करण्यात आल्याने कार्यकर्ते खूष होते. पुरुष कार्यकर्ते टी-शर्ट, तर महिला भगव्या साड्या परिधान करून विविध वसाहती, झोपडपट्टी अशा ठिकठिकाणी बसले होते. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याबरोबरच मतदारांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करीत होते. त्यामुळे गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत भगव्या रंगाचेच दर्शन होत होते.असाही छुपा प्रचार
मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी सर्व पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. अनेक कार्यकर्ते, महिला गल्लीबोळांत टेबल लावून ज्येष्ठ, अपंग मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, बूथ शोधून देण्यास मदत करीत होते. टेबलवर चिन्ह, उमेदवाराचे नाव लावण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी पक्ष चिन्ह, उमेदवाराचे नाव असलेले बॅनर्स ठळकपणे दिसतील अशा पद्धतीने लावून छुपा प्रचार करीत असल्याचे दिसून आले.
Web Summary : During Mumbai elections, BJP and Shinde Sena activists were highly visible. Dressed in saffron, they guided voters, while opposition presence was limited. Hidden campaigning tactics observed.
Web Summary : मुंबई चुनाव के दौरान, भाजपा और शिंदे सेना के कार्यकर्ता प्रमुखता से दिखे। भगवा वस्त्रों में, उन्होंने मतदाताओं का मार्गदर्शन किया, जबकि विपक्ष की उपस्थिति सीमित थी। छिपे हुए प्रचार के तरीके देखे गए।