Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC election Results 2026: मानखुर्द, गोवंडीत उत्साह; दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:10 IST

काही ठिकाणी गैरप्रकाराचे आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मानखुर्द, गोवंडी परिसरात उत्साहात मतदान पार पडले. सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावून आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नावे नसणे, दुसऱ्याच केंद्रावर मतदार यादीत मतदाराचे नाव अशा तक्रारी आल्या. मात्र, तपासणीनंतर संबंधित मतदारांची नावे इतर मतदान केंद्रांमध्ये नोंद असल्याचे स्पष्ट झाले.

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. सुरुवातीला काही केंद्रांवर मतदानाची गती संथ असली, तरी दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढत गेला. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करताना मतदारांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्व्हरवरील ताणामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मानखुर्द-शिवाजीनगर विभागात चुरशीची लढत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय दिसून आले. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी परिसरात फिरत होते. राजकीय पक्षांच्या मदत केंद्रांवर मतदारांची नावे शोधण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली होती.

पोलिस व प्रशासनाकडून सुरक्षेचा चोख बंदोबस्त

मतदारांनी आपला ईपिक क्रमांक सांगितल्यानंतर कोणत्या मतदान केंद्रावर नाव आहे, याची प्रिंटआउट त्वरित दिली जात होती, त्यामुळे अनेकांचा संभ्रम दूर झाला. दुपारनंतर काही भागांतील मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्याचे चित्र होते. पोलिस व प्रशासनाकडून सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत देखरेख करण्यात येत होती. एकूणच मानखुर्द-गोवंडी परिसरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता उमेदवारांसह मतदारांनाही निकालाची उत्सुकता लागली आहे.

आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा... 

प्रभाग १३६ मध्ये बोगस मतदानाच्या आरोपाखाली काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या मुलाने एमआयएमच्या उमेदवाराला धमकावल्याचाही आरोप करण्यात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Enthusiastic Voting in Mankhurd, Govandi; Turnout Increased After Noon

Web Summary : Mankhurd and Govandi witnessed enthusiastic voting for the BMC elections. Despite some voter list issues, citizens actively participated. Senior citizens, women, and youth were notably present. Security was tight as voting concluded peacefully, with anticipation for the results.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६