मुंबई : मुंबई पालिकेसाठी झालेल्या तिरंगी लढतीत उद्धवसेनेने चार माजी महापौर व एक माजी उपमहापौरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. या सर्व उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत पुन्हा पालिका सभागृहात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या महापौरांना या अनुभवी महापौरांचा सामना सभागृहात लागणार आहे.
उद्धवसेनेने या निवडणुकीत माजी महापौर मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव व किशोरी पेडणेकर यांना रिंगणात उतरवले होते. तसेच माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना पुन्हा संधी दिली होती. फणसे यांनी ६,६१० मते घेऊन प्रभाग ५९ मधून भाजपचे माजी नगरसेवक योगिराज दाभाडकर यांचा पराभव केला. दाभाडकर यांना ६,२३७ मते मिळाली आहेत.
हेमांगी वरळीकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय
वरळीमध्ये माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनाही पदाधिकाऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले होते. त्यांच्याही विरोधात शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी अर्ज भरला होता. तर, शिंदेसेनेचे प्रल्हाद वरळीकर यांचे त्यांच्यासमोर आव्हान होते. मात्र, वरळीकर यांनी दोघांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. २ या सर्व अनुभवी नेत्यांच्या यशामुळे पालिका सभागृहात उद्धवसेनेची भूमिका आक्रमक व प्रभावशाली असणार आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेतील राजकीय घडामोडी अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
बंडखोरांचा पराभव...
प्रभाग १८२ मधून मिलिंद वैद्य यांनी भाजपच्या राजन पारकर यांचा प्रभाव केला आहे. वैद्य यांनी १४,२४८ मते घेत पारकर यांच्यावर ९,८५४ मतांनी विजय मिळविला आहे. तर दादरच्या १९१ प्रभागातून विशाखा राऊत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला. प्रभाग २०२ मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्याने नाराजी पसरली होती. शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, जाधव यांच्यावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवत भाजपचे पार्थ बावकर व इंदुलकर यांचा पराभव केला.
Web Summary : Uddhav Sena's four former mayors and one deputy mayor won the Mumbai civic elections. They defeated their rivals, re-entering the corporation. This experienced team will challenge the BJP's new mayor in the house, promising dynamic political activity.
Web Summary : उद्धव सेना के चार पूर्व महापौर और एक उपमहापौर ने मुंबई नगर निगम चुनाव जीता। उन्होंने अपने प्रतिद्वंद्वियों को हराया और फिर से निगम में प्रवेश किया। अनुभवी टीम सदन में भाजपा के नए महापौर को चुनौती देगी, जिससे गतिशील राजनीतिक गतिविधि का वादा किया गया है।