BMC ELECTION RESULT : मुंबईत सेंच्युरी मारणार - संजय राऊत

By Admin | Updated: February 23, 2017 18:26 IST2017-02-23T12:19:09+5:302017-02-23T18:26:30+5:30

मुंबई मनपा मतमोजणीच्या कलानुसार शिवसेना आघाडी आहे. यावर 'मुंबईत सेंच्युरी मारणार', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

BMC ELECTION RESULT: Sanjay Raut to be a Century in Mumbai | BMC ELECTION RESULT : मुंबईत सेंच्युरी मारणार - संजय राऊत

BMC ELECTION RESULT : मुंबईत सेंच्युरी मारणार - संजय राऊत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेना 80 जागांवर आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या या कलानुसार 'मुंबईत सेंच्युरी मारणार', असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 
 
स्वबळावर मुंबई महापालिकेत येऊ आणि राजदंड शिवसेनेकडेच असेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. 
शिवाय, आमचा सूर्य मावळणार नाही तर तळपत राहणार, असेदेखील राऊत म्हणाले आहेत. 
 
मुंबईत 23 केंद्रावर मतमोजणी सुरु असून शिवसेनेने 75 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. दुस-या क्रमांकावर भारतीय जनता पार्टी असल्याचे पाहायला मिळत आहे. 
दरम्यान, मुंबईमध्ये राज्यातील सत्तेत एकत्र नांदणारे मित्रपक्ष शिवसेना-भाजपामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. 

Web Title: BMC ELECTION RESULT: Sanjay Raut to be a Century in Mumbai