BMC Election - दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान
By Admin | Updated: February 21, 2017 15:36 IST2017-02-21T15:35:16+5:302017-02-21T15:36:17+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत असून दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान झाले आहे.

BMC Election - दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान झाले आहे.
मुंबईतील उपनगरासह शहरातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मात्र, मतदार राजाकडून मतदानाचा जेमेतम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान झाले आहे. तर, ठाणे महानगरपालिकेसाठी 35.11 टक्के आणि उल्हासनगर महापालिकेसाठी 24.83 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील १० महानगरपालिकांच्या या निवडणुकीत मुंबई महापालिकेची लढत सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच, या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत.