लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बंडोबांची मनधरणी करत त्यांना 'थंड' करण्यात भाजप आणि शिंदेसेनेला चांगले यश आले आहे. दुसरीकडे उद्धवसेना आणि मनसेच्या काही बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर शनिवारपासून सर्वच पक्षांची प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे रुसवे-फुगवेही बऱ्यापैकी कमी झाले आहेत.
हौसिंग सोसायट्या, चाळीतील नागरिकांशी संपर्क सुरू झाला आहे. महिला बचत गटांसह विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराची रणनीती आखत पुढच्या काही दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. मुंबईत भाजप, उद्धवसेना, मनसे,शिंदेसेना, काँग्रेस, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन पार्टी आदी पक्षांत लढत आहे. काही उमेदवारांनी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेतले आहे. त्यांच्या मदतीने उमेदवार पहिल्यांदा मंडळात आणि घराघरात दाखल होत आहेत.
पूर्व उपनगरात महायुतीच्या काही उमेदवारांनी या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. तर पश्चिम उपनगरात महायुतीच्या उमेदवारांनी समाज संस्था आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. अनेक उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले आहे. वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक गटातील मतदारांशी संपर्क साधणे, त्यांची मते आपल्याकडे कशी वळवता येईल, याचे गणित बांधले आहे.
घराघरांतून बैठका
दक्षिण मुंबईसह दक्षिण मध्य १ मुंबई अनेक चाळी आजही तग धरून आहेत. या चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा उमेदवारांनी प्रचाराचा मुद्दा केला आहे. यातून चाळीतील मते कशी आपल्याला मिळतील? यासाठी घराघरातून प्रचार केला जात आहे. कुर्ला, कलिना, चांदिवली, घाटकोपर, चेंबूरसह येथील काही महिला उमेदवारांच्या महिला कार्यकर्त्यांनी महिलांचे गट बनविले असून चार दिवसांपूर्वीच सोसायटीमध्ये दाखल होत प्रचार सुरू केला आहे.
महिलांचा मोठा सहभाग
पूर्व व पश्चिम उपनगरात राजकीय पक्षांनी महिलांना एकाच रंगाच्या साड्या दिल्या आहेत. या साड्या घालून महिलांना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रचारात सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांची सकाळच्या नाष्ट्यापासून जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Web Summary : With candidate withdrawals complete, parties begin campaigning, targeting housing societies and communities. Candidates are connecting with voters through various groups, focusing on local issues like redevelopment. Women's groups are actively participating, aiming to sway voters in key areas.
Web Summary : उम्मीदवारों द्वारा नाम वापस लेने के बाद, पार्टियों ने हाउसिंग सोसायटियों और समुदायों को लक्षित करते हुए प्रचार शुरू कर दिया है। उम्मीदवार विभिन्न समूहों के माध्यम से मतदाताओं से जुड़ रहे हैं, और पुनर्विकास जैसे स्थानीय मुद्दों पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। महिला समूह सक्रिय रूप से भाग ले रहे हैं, जिसका उद्देश्य प्रमुख क्षेत्रों में मतदाताओं को प्रभावित करना है।