राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता आठवड्यावर आली आहे. त्यामुळे प्रचाराचा जोरही आता वाढला आहे. ही निवडणूक लढवत असलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांकडून मोठ्या प्रचारसभांसह घरोघरी भेटी देऊन आपला प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात मुंबईमध्ये खरी शिवसेना कुणाची यावरून उद्धवसेना आणि शिंदेसेनेमध्ये निकराची लढाई होत आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपही होत आहेत. अशा परिस्थितीत आज प्रभाग क्रमांक ९३ मधील शिंदेसेनेचे उमेदवाार सुमित वांजळे हे प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे मत मागण्यासाठी पोहोचल्याने सारेच अवाक् झाले.
शिवसैनिकांच्या मनात मानाचं स्थान असलेलं मातोश्री निवासस्थान हे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९३ मध्ये येतं. येथून शिंदेसेनेचे सुमित वांजळे हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्या कार्यकर्त्यांमधून सध्या विस्तवही जात नाही अशी परिस्थिती असताना आज सुमित वांजळे यांनी प्रचारासाठी थेट मातोश्री निवासस्थान गाठले. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला थेट ठाकरेंच्या दारात पाहून तिथे असलेले सुरक्षा रक्षकही बुचकाळ्यात पडले. तेव्हा हा भाग माझ्या मतदारसंघात येतो. तसेच ठाकरे कुटुंबीय हे आपले मतदार आहेत. मला आत जाऊ द्या, माझे प्रचाराचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडू द्या, त्यांच्या कुटुंबातील कुणीही भेटलं तरी चालेल, असे सांगत सुमित वांजळे यांनी ठाकरे कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र सुमित वांजळे यांना तिथे कुणी भेटला की नाही हे, समोर आलं नाही. मात्र उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले असताना थेट मातोश्रीजवळ जाऊन आपला प्रचार करण्याचा आणि प्रचाराची पत्रकं सोपवण्याचा प्रयत्न करून सुमित वांजळे यांनी केलेल्या प्रचाराची एकच चर्चा झाली.
Web Summary : Amidst BMC elections, Shinde Sena's candidate, Sumit Wanjale, visited Matoshree to seek votes. This unexpected move stirred curiosity as Wanjale aimed to engage with the Thackeray family, emphasizing they are his voters. His attempt sparked discussions.
Web Summary : बीएमसी चुनाव के बीच, शिंदे सेना के उम्मीदवार सुमित वांजले ने मातोश्री में वोट मांगे। इस अप्रत्याशित कदम ने उत्सुकता जगाई क्योंकि वांजले का लक्ष्य ठाकरे परिवार के साथ जुड़ना था, यह जोर देते हुए कि वे उनके मतदाता हैं। उनके प्रयास ने चर्चाओं को जन्म दिया।