लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील बहुसंख्य उमेदवारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत असताना काही उमेदवारांच्या संपत्तीत उल्लेखनीय घट झाली आहे. भाजपच्या माजी उपमहापौर अलका केरकर व माजी नगरसेवक राजा रेहबर खान यांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी केरकर यांचा कोट्यधीश ते लखपती असा उलटा प्रवास झाला आहे.
केरकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात २०१७ मध्ये त्यांची संपत्ती पाच कोटी ३० लाख ५१ हजार ६५ रुपये होती, तर आता त्यांची एकूण संपत्ती २२ लाख ९८ हजार ६१ रुपये झाल्याचे नमूद केले आहे. म्हणजे त्यांच्या संपत्तीत पाच कोटी सात लाख ५३ हजार चार रुपयांची घट झाली आहे. २०१७ मध्ये कोट्यधीश उमेदवार असलेल्या केरकर २०२६ मध्ये लखपती झाल्या आहेत. केरकर यांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ६१ रुपये नमूद केले आहे. २२.९८ लाखांची संपत्ती अलका केरकर यांच्याकडे आहे.
१२.८० कोटींनी घसरण
राजा रेहबर खान यांची संपत्ती २०१७ च्या निवडणुकीत १७ कोटी ८२ लाख ६१ हजार रुपये होती. २०२६ मध्ये त्यांची एकूण संपत्ती पाच कोटी दोन लाख ४८ हजार ५०० झाली आहे, म्हणजे त्यांच्या संपत्तीत १२ कोटी ८० लाख १२ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे.
सहा लाखांवरून दोन कोटी
प्रभाग क्रमांक ९३ एमआयजी कॉलनी येथील उद्धवसेनेच्या उमेदवार रोहिणी कांबळे यांची २०१७ मध्ये पाच लाख २६ हजार ३३१ रुपयांची मालमत्ता होती. ती आता दोन कोटी १४ लाख ५९ हजारांवर गेली आहे. प्रभाग ९९ खारदांडा येथील काँग्रेसच्या उमेदवार सुनीता वावेकर यांची संपत्ती २०१२ मध्ये १० लाख ५६ हजार होती. ती आता पाच कोटी १३ हजार रुपये झाली आहे.
Web Summary : While many candidates' wealth increased, Alka Kerkar's assets decreased from crores to lakhs. Raja Khan also saw a significant wealth reduction. Conversely, Rohini Kamble and Sunita Wavekar experienced notable asset growth.
Web Summary : कई उम्मीदवारों की संपत्ति बढ़ी, लेकिन अलका केरकर की संपत्ति करोड़ों से लाखों में आ गई। राजा खान की संपत्ति में भी भारी गिरावट आई। वहीं, रोहिणी कांबले और सुनीता वेवेकर की संपत्ति में उल्लेखनीय वृद्धि हुई।