Join us
Daily Top 2Weekly Top 5

३० प्रभागांत 'बिग फाइट'; आमदार, खासदारांचे वारसदार रिंगणात, काही ठिकाणी नवीन चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:39 IST

आमदार, खासदारांच्या वारसदारांना रिंगणात उतरवून सर्व पक्षांनी निवडणुकीत रंगत आणली आहे.

महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वच पक्षांनी पालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली असून सत्ता मिळविण्यासाठी तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. मुंबईमध्ये ३० प्रभागांमध्ये हेवी वेट नेत्यांची 'बिग फाइट' होणार असल्याचे चित्र आहे. माजी नगरसेवकांना आव्हान देण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, आमदार, खासदारांच्या वारसदारांना रिंगणात उतरवून सर्व पक्षांनी निवडणुकीत रंगत आणली आहे.

काही प्रभागांत पक्षांतर केलेले नेते एकमेकांसमोर आहेत. मुंबईतील १४ प्रभागांत दोन माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात लढत देत आहेत तर, उद्धवसेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे (प्रभाग १४१) तर त्यांची पत्नी सुनंदा लोकरे (प्रभाग) १४२ मधून निवडणूक रिंगणात आहेत. पती-पत्नी निवडणूक लढवत असल्याचे मुंबईतील हे एकमेव उदाहरण आहे.

तीन खासदारकन्या उतरल्या मैदानात

प्रभाग ७३ मधून शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर-पोतनीस, प्रभाग ११४ मध्ये उद्धवसेनेचे खा. संजय दीना पाटील यांची मुलगी राजुल तर काँग्रेसचे राज्यसभा खा. चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती ही प्रभाग १४० मधून निवडणूक लढवत आहे.

आमदार पत्नी, पुत्रही उमेदवारीत मागे नाहीत

शिंदेसेनेचे चांदिवली विधानसभेचे आ. दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला (प्रभाग १६३), उद्धवसेनेचे भायखळा विधानसभेचे आ. मनोज जामसुतकर यांची पत्नी सोनम जामसुतकर (प्रभाग २१०) व अंधेरी पूर्वचे शिंदेसेनेचे आ. मुरजी पटेल यांची पत्नी केशरबेन पटेल या भाजपच्या तिकिटावर प्रभाग ८१ मधून पुन्हा नशीब आजमावत आहेत.

भाजपचे विधान परिषदेतील आ. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर (प्रभाग ३), दिंडोशी विधानसभेचे उद्धवसेनेचे आ. सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित (प्रभाग ५४), उद्धवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे आ. हारून खान यांची मुलगी सबा खान (प्रभाग ६४) व मालाड विधानसभेचे काँग्रेस आ. अस्लम शेख यांचा मुलगा हैदरअली शेख (प्रभाग ३४ मधून) निवडणूक लढवत आहेत.

मुंबई महानगरपालिका: लक्षवेधी लढती

प्रभाग क्रमांकउमेदवार १ (पक्ष)उमेदवार २ (पक्ष)
तेजस्वी घोसाळकर (भाजप)धनश्री कोलगे (उद्धवसेना)
गणेश खणकर (भाजप)सौरभ घोसाळकर (उद्धवसेना)
१३रवी द्विवेदी (भाजप)आसावरी पाटील (उद्धवसेना)
१८संध्या दोषी (शिंदेसेना)सदिच्छा मोरे (मनसे)
४७तेजिंदर सिंग तिवाना (भाजप)गणेश गुरव (उद्धवसेना)
५६राजुल देसाई (भाजप)लक्ष्मी भाटिया (उद्धवसेना)
६१राजुल पटेल (शिंदेसेना)सेजल सावंत (उद्धवसेना)
७४उज्ज्वला मोडक (भाजप)विद्या कांगणे (मनसे)
८९राजेश नाईक (शिंदेसेना)जितेश राऊत (उद्धवसेना)
१०६प्रभाकर शिंदे (भाजप)सत्यवान दळवी (मनसे)
१३५नवनाथ बन (भाजप)समीक्षा साखरे (उद्धवसेना)
१७८अमेय घोले (शिंदेसेना)बजरंग देशमुख (मनसे)
१९१प्रीती सरवणकर (शिंदेसेना)विशाखा राऊत (उद्धवसेना)
१९२प्रीती पाटणकर (शिंदेसेना)यशवंत किल्लेदार (मनसे)
१९४समाधान सरवणकर (शिंदेसेना)निशिकांत शिंदे (उद्धवसेना)
१९८वंदना गवळी (शिंदेसेना)अबोली खाड्ये (उद्धवसेना)
१९९रुबल कुसळे (शिंदेसेना)किशोरी पेडणेकर (उद्धवसेना)
२०२विजय तेंडुलकर (अपक्ष - उद्धवसेना पुरस्कृत)श्रद्धा जाधव (उद्धवसेना)
२०४अनिल कोकीळ (शिंदेसेना)किरण तावडे (उद्धवसेना)
२०९यामिनी जाधव (शिंदेसेना)हसीना माहिमकर (मनसे)
२२५हर्षिता नार्वेकर (भाजप)अजिंक्य धात्रक (उद्धवसेना)

 

टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राजकारण