Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election 2026: ८७९ महिला निवडणुकीच्या रिंगणात!; देवनार, मानखुर्द, चेंबूरमध्ये ६८ जणी अजमावणार नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:34 IST

BMC Election 2026: त्यात ८२१ पुरुष, तर ८७९ महिला उमेदवार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुरुषांच्या बरोबरीने १,७०० महिलांचाही राजकारणात सहभाग वाढला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात ८२१ पुरुष, तर ८७९ महिला उमेदवार आहेत. 

देवनार, मानखुर्द, चेंबूर, शिवाजीनगर, गोवंडी या प्रभागातून सर्वाधिक ६८ महिला उमेदवार निवडणूक ८२१ पुरुष निवडणुकीच्या उतरले आहेत. आखाड्यात लढवत आहेत.

पालिकेतील २२७ पैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्व जागांवर मिळून ८७९ महिला रिंगणात असून, त्यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. अनेक ठिकाणी खुल्या प्रर्वगातूनही त्या पुरुषांना आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. भाजपच्या एकूण १३७ उमेदवारांच्या यादीत ७६ महिला असून, ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. उद्धवसेना-मनसे, काँग्रेसनेही महिलांना झुकते माप देत खुल्या गटातील जागांवर उमेदवारी दिली आहे.

प्रभाग / परिसरमहिला उमेदवारांची संख्या
देवनार, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी६८
वडाळा, दादरचा काही भाग, सायन६६
धारावी, माहिम, दादरचा काही भाग५९
अंधेरी पूर्व५६
घाटकोपर५१
भायखळा, चिंचपोकळी, रे रोड५०
अंधेरी पश्चिम४६
भांडुप४६
मालाड४२
मुलुंड३७
कुर्ला३५
वरळी, प्रभादेवी परिसर३४

 

English
हिंदी सारांश
Web Title : 879 women contesting elections; 68 from Deonar, Mankhurd, Chembur.

Web Summary : Mumbai civic polls see increased female participation. 879 women contest, exceeding men. Deonar, Mankhurd, Chembur lead with 68 female candidates. Parties favor women.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राजकारण