Join us  

दहीसर नदीवरील पुलामुळे बिकट वाट होणार सोपी; लवकरच कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 9:46 AM

२७ कोटींचा खर्च अपेक्षित.

मुंबई : दहीसर पश्चिम येथील लक्ष्मण म्हात्रे रोड ते रंगनाथ केसरक मार्ग यांना जोडणाऱ्या मार्गावरील दहीसर नदीवर ६० फूट रुंदीचा पूल पालिका प्रशासनाकडून बांधला जाणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची निवड झाली असून लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पालिका प्रशासनाकडून पुलाच्या बांधकामासाठी २७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. 

मुंबईच्या विकास नियोजन आराखडा २०३४ नुसार, दहीसर पश्चिम येथील लक्ष्मण म्हात्रे रोड ते रंगनाथ केसकर यांना जोडणारा जोडणारा ६० फूट रुंदीचा रस्ता मंजूर झाला आहे.  या रस्त्याच्या रिव्हर व्हॅली सोसायटीच्या जवळील काही भागाचे काम असून उर्वरित काही भाग विकसित केला जात आहे. उच्च न्यायालयानेही सप्टेंबर २०२१ रोजी मंजूर आराखड्यात नमूद केले उर्वरित भागाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. दहीसर नदीचा भाग हा ६० फूट डीपी रोडचा एफ भाग आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ६० फूट रुंदीचा दहीसर नदीवरील पूल प्रस्तावित करण्यात आला आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी मागवलेल्या निविदेमध्ये स्पेको इन्फ्रास्ट्रक्चरल ही कंपनी पात्र ठरली असून, पुलाच्या बांधकामाकरिता पुलाचा आराखडा, नियोजन, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक व मसुदा बनविणार आहे. यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. 

टॅग्स :दहिसरनगर पालिकानदी