Join us  

BMC Budget 2018: ना करवाढ, ना नवा कर; मुंबईकरांना महापालिकेचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 2:58 PM

देशाच्या अर्थसंकल्पाने निराश झालेल्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना महापालिकेच्या अर्थसंकल्पाने दिलासा दिला आहे. 2018-19 या वर्षासाठी आज मांडण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये कुठल्याही करात वाढ करण्यात आलेली नाही किंवा कुठलाही नवा कर लावण्यात आलेला नाही.  

मुंबईः देशाच्या अर्थसंकल्पाने निराश झालेल्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना महापालिकेच्या अर्थसंकल्पाने दिलासा दिला आहे. 2018-19 या वर्षासाठी आज मांडण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये कुठल्याही करात वाढ करण्यात आलेली नाही किंवा नागरिकांवर कुठलाही नवा कर लावण्यात आलेला नाही.  यंदाचं बजेट 27 हजार 258 कोटी रुपयांचं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 8.42 टक्क्यांची वाढ झालीय. 

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईचा वेग वाढवण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात घसघशीत तरतूद करण्यात आलीय. कोस्टल रोडसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय, तर गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी १०० कोटींचा निधी देण्यात आलाय. पूरनियंत्रण आणि खड्ड्यांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठीही विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. मॅनहोलवर जाळ्या बसवण्याच्या कामासाठीही निधी राखून ठेवलाय. परंतु, तोट्यात चाललेल्या बेस्टला आधार देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. 

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्देः

>> आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर केला अर्थसंकल्प>> राज्य शासनाकडून महापालिकेला तब्बल 3901.91 कोटी रुपये येणे बाकी. मालमत्ता कर,जल व मलनिस्सारण कर या पोटी ही थकबाकी>> भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन निधी अशा एकूण 21 हजार 176 कोटी रुपयांच्या राखीव निधीतून 2743.96 कोटी रुपये विकास कामांसाठी वापरणार>> करांमध्ये वाढ नाही, नवे कर प्रस्तावित नाहीत>> रस्ते कामांसाठी 1202 कोटींची तरतूद>> पूरनियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजन करण्यासाठी 53.71 कोटींची तरतूद>> नवीन पूल बांधणीसाठी ४६७ कोटी >> १४५० मॅनहोलवर जाळ्या बसविण्यासाठी १.२२ कोटी  >> मिठी नदी स्वच्छतेसाठी १५ कोटी >> तानसा पाईपलाईन शेजारील सायकल ट्रॅकसाठी १०० कोटी >> भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना नियमित दराने पाणीपुरवठा होणार>> कोस्टल रोड प्रकल्पासाठी 1500 कोटींची तरतूद. या प्रकल्पाचा खर्च 15 हजार कोटी>> पादचारी पूल आणि स्कायवॉकला स्वयंचलित जिने बसवणार>> मुंबईतील 25 दवाखान्यांची दुरुस्ती, गरिबांना प्राथमिक स्तरावर उपचार मिळण्यासाठी 1.05 कोटी>> केईएम, सायन, नायर वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहासाठी 15 कोटी>> तीन आरोग्य केंद्र, 25 दवाखाने व पाच प्रसुतीगृहांच्या दर्जोन्नतीसाठी 50.70 कोटींची तरतूद

टॅग्स :मुंबई महानगरपालिका बजेट २०१८मुंबई महानगरपालिकाशिवसेना