Join us

ब्ल्यू मून योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 14:38 IST

Moon : ३१ ऑक्टोबरचा चंद्र  ब्ल्यू मून

मुंबई : ३१ ऑक्टोबरचा चंद्र  ब्ल्यू मून असणार आहे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणतात.

ऑक्टोबर महिन्यात ब्ल्यू मून योग येत आहे. १ ऑक्टोबर रोजी अधिक आश्विन पौर्णिमा तर ३१ ऑक्टोबर रोजी निज आश्विन पौर्णिमा आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरचा चंद्र  ब्ल्यू मून असणार आहे. यावेळी चंद्र काही ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचा दिसत नाही. हा योग कधीतरी येतो. म्हणून दुर्मिळ घडणा-या घटनांचा उल्लेख  वन्स इन ब्ल्यू मून असा करतात. 

दरम्यान, ३१ मार्च २०१८ रोजी असा योग आला होता. आता यानंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी ब्ल्यू मून योग येणार आहे.  

टॅग्स :विज्ञानमुंबई