लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून
By Admin | Updated: June 3, 2015 23:11 IST2015-06-03T23:11:52+5:302015-06-03T23:11:52+5:30
लग्न कर असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने कोयत्याने वार करून खून करण्याची व नंतर पोलीस ठाण्यात हजर होण्याची घटना रविवारी रात्री

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून
ठाणे/मुंब्रा : लग्न कर असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने कोयत्याने वार करून खून करण्याची व नंतर पोलीस ठाण्यात हजर होण्याची घटना रविवारी रात्री दिवा येथे घडली. अमर व स्वप्नालीची चार वर्षांपासून एकमेकांशी मैत्री होती. तिचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. लग्नासाठी मात्र चालढकल होत असल्यामुळे स्वप्नाली घाडी (१८) हिने लग्नाचा तगादा लावला. लग्नाची कटकट कायमची मिटविण्यासाठी अमर पाटील (२१) याने आपल्याच प्रेयसीचा कोयत्याने वार करुन खून केला. खूनानंतर त्याने स्वत:हूनच मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झालेल्या अमरला ६ जूनपर्यन्त कोठडी मिळाली आहे. गेल्या महिनाभरात ठाणे परिसरातील अशा प्रकारे खूनाची दुसरी घटना आहे.
दिव्यातील सद्गुरु नगरमध्ये राहणाऱ्या स्वप्नाली आणि डोंबिवलीतील अमर यांचे दहावीपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघेही गरीब कुटुंबातील असून अमरचे गेल्या काही स्वप्नालीच्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचा तिला संशय होता. याबाबत तिने त्याला खडसावलेही होते. याच कारणावरुन
त्यांच्यात काहीसा दुरावा आला होता. त्याने मात्र रोजगार नसल्यामुळे सध्या लग्नाचा विचार नको, असे तिला सांगितले होते. तरीही लग्न केले नाहीतर घरात घुसण्याचा इशारा तिने त्याला दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी त्याने तिला रविवारी भेटण्यासाठी बोलविले. दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या विषयावरु न वादावादी झाली. त्यावेळी त्याने संतापाच्या भरात स्वप्नालीच्या गळयावर कोयत्याने जोरदार वार केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, हातावरही त्याने दोन वार केले. या खूनानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात स्वत:हून तो हजर झाला.
(प्रतिनिधी)