महामुंबईतील रक्तदाते जपताहेत ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST2021-07-17T04:06:40+5:302021-07-17T04:06:40+5:30

मुंबई : लोकमतच्या वतीने ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ...

Blood donors in Mumbai are keeping 'relationship is blood' | महामुंबईतील रक्तदाते जपताहेत ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’

महामुंबईतील रक्तदाते जपताहेत ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’

मुंबई : लोकमतच्या वतीने ‘नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरून निघावा तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी लोकमतच्या वतीने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील वर्षभर आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये, यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे. यासाठी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

१७ जुलै - पेण वडखळ : जेएसडब्ल्यू / संजीवनी हॉस्पिटल, जेएसडब्ल्यू, वडखळ / ९ ते ६

१७ जुलै - घाटकोपर पश्चिम : रोटरॅक्ट क्लब मुंबई घाटकोपर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ एस. के. सोमय्या कॉलेज / पतनवाला इस्टेट गुड वूड बिल्डिंग, पहिला मजला, एल. बी. एस. मार्ग घाटकोपर पश्चिम / १० ते २

१७ जुलै - कांदिवली पश्चिम : विनायक पाटील कार्यवाह श्री एकवीरा विद्यालय, चारकोप कांदिवली पश्चिम, प्रेरणा फाउंडेशन / श्री एकवीरा विद्यालय सेक्टर १ चारकोप कांदिवली पश्चिम / ११ ते ४

१७ जुलै - ग्रँट रोड पूर्व : रोटरॅक्ट क्लब ऑफ कॅडूसेअस आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल / बॉम्बे वायएमसीए, लॅमिंग्टन रोड ग्रँट रोड पूर्व / १० ते ४

१७ जुलै - विलेपार्ले पश्चिम : रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई डाउनटाउन / नानावती रुग्णालय ब्लड बँक विलेपार्ले पश्चिम / ९ ते ४

१७ जुलै - भाईंदर पूर्व : रोटरॅक्ट क्लब ऑफ सराफ कॉलेज आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट / ओस्तवाल बगिचा आरएनपी पार्क, भाईंदर पूर्व / १० ते १

--------------

१८ जुलै - विरार पश्चिम : कच्छ युवक संघ, विरार शाखा / पहिला मजला, राम मंदिर, एम.बी. इस्टेट, विरार पश्चिम / ९:३० ते ४:३०

१८ जुलै - बोरिवली पश्चिम : कच्छ युवक संघ, बोरिवली दहिसर शाखा / पहिला मजला, अय्यप्पा मंदिर कॉम्प्लेक्स, नंदिधाम ऑडिटोरियम, एस. व्ही. मार्ग, कल्याण ज्वेलर्सजवळ, बोरिवली पश्चिम / ९ ते २

१८ जुलै - शिवडी : कच्छ युवक संघ, साऊथ बॉम्बे शाखा / ज्यूलीएट हाऊस, टी. जे. मार्ग, शिवडी नाका, शिवडी / ९ ते ६

१८ जुलै - मुलुंड पूर्व : केळकर एज्युकेशन ट्रस्ट स्थापित, वि. ग. वझे काॅलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स / मिठागर रोड, मुलुंड-(पूर्व) / १० ते ५

१८ जुलै - अंधेरी पूर्व : जन प्रहार फाउंडेशन, भीमेश नरसप्पा मुतुला, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक, श्रमिक कामगार संघटना आणि जन प्रहार वैद्यकीय साहाय्यता कक्ष प्रमुख / श्री लक्ष्मी नारायण हॉल, अंधेरी कुर्ला मार्ग नटराज स्टुडिओ, आकाश कॉलेजजवळ अंधेरी पूर्व / ९ ते ३

१८ जुलै - पालघर : कच्छ युवक संघ पालघर शाखा / चहाडे पालघर / ९ ते ४

१८ जुलै - ठाणे पश्चिम / जयश्री राजेश सोलंकी उडान एक सामाजिक प्रतिष्ठान / शॉप नंबर ९ जयश्री सलोन अँड स्पा, नीळकंठ हाइट्स ठाणे पश्चिम / १२ ते ५

१८ जुलै - ठाणे पश्चिम : अर्पण फाउंडेशन, भावना डुंबरे / क्लब हाऊस, हिरानंदानी इस्टेट, जीबी मार्ग, ठाणे पश्चिम / १० ते २

१८ जुलै - ठाणे पश्चिम : शिवसेना शाखाप्रमुख महेंद्र लक्ष्मणराव देशमुख आणि सहकारी, सिव्हिल इंजिनियर, एस.इ.ओ., अध्यक्ष स्पर्श फाउंडेशन / सांजस्नेह सीनियर सिटीजन हॉल ब्रह्मांड पोलीस स्टेशनजवळ जी.बी. मार्ग, ठाणे पश्चिम / १० ते ४

१८ जुलै - ठाणे पश्चिम : कच्छ युवक संघ ठाणे शाखा / श्री वर्धमान जैन स्थानक, ए.सी. हॉल तिसरा मजला नौकाविहार ठाणे पश्चिम / ९ ते ६

१८ जुलै - ठाणे : जस्टो रिव्हर वूड पार्क / रिव्हर वूड पार्क सेल्स गॅलरी, रिव्हर वूड पार्क, कल्याण शिळफाटा मार्ग, खिडकाळेश्वर मंदिराजवळ सागर्ली गाव डोंबिवली / १० ते ४

१८ जुलै - दहिसर पूर्व : कच्छ युवक संघ बोरिवली दहिसर शाखा / रोटरी गार्डन युनियन बँकेजवळ, सी. एस. रोड ३ दहिसर पूर्व / ९ ते ३

येथे संपर्क साधा

‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

http://bit.ly/lokmatblooddonation

Web Title: Blood donors in Mumbai are keeping 'relationship is blood'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.