थॅलॅसीमिया मुलांसाठी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:33+5:302021-02-05T04:23:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चिंगारी शक्ती फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, महाकाली हाइट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ...

थॅलॅसीमिया मुलांसाठी रक्तदान शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चिंगारी शक्ती फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, महाकाली हाइट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३ या वेळेत शेर ए पंजाब गुरुद्वारा, लंगर हॉल, अंधेरी (पूर्व) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
.....................................
बोरीवलीमध्ये महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन
मुंबई : होतकरू मराठी तरुण-तरुणींना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देणारी महाराष्ट्र व्यापारी पेठ मुंबईकरांच्या भेटीसाठी येत आहे. कोरोना आजारामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पुनश्च हरीओम करण्याच्या उद्देशाने मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळातर्फे २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत महाराष्ट्र व्यापारी पेठेचे मुंबईतील भाटियावाडी हॉल, ५७ टीपीएस रोड, बाभई नाका, बोरीवली, पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे.
..........................