आझाद मैदानात कोरोना रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:06 IST2021-04-05T04:06:02+5:302021-04-05T04:06:02+5:30

मुंबई : सैफी स्काऊट ग्रुप आणि सैफी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदान येथे रविवार, ४ एप्रिल रोजी रक्तदान ...

Blood donation camp for corona patients at Azad Maidan | आझाद मैदानात कोरोना रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

आझाद मैदानात कोरोना रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

मुंबई : सैफी स्काऊट ग्रुप आणि सैफी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदान येथे रविवार, ४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात सद्यस्थितीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नाही. कोरोना किंवा अन्य व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा कमी पडू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक तरुण-तरुणी आणि अन्य वयोगटातील रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे आले.

नगरसेवक आकाश राज पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत हे रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. कोरोनाकाळात रक्तदान करून आपण देशकार्यात मोलाचे योगदान देत आहात, अशा शब्दात त्यांनी दात्यांचे आभार मानले. यावेळी विभाग अध्यक्ष अंकित शर्मा, जीवन मेरिपल्ली, विजय भागवत आदी भाजपचे युवा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp for corona patients at Azad Maidan