Join us  

टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठ्याची मुदत संपतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 6:19 AM

राज्यातील रक्तपेढ्यांकडे २० दिवस पुरेल इतका साठा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा राज्याला वाढता विळखा आणि त्यात लॉकडाऊनचा कालावधीत रक्तसाठा उपलब्ध करणे हे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असल्याने वेळोवेळी आरÞोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून लहान स्वरुपात रक्तदान शिबिर आयोजित करा, त्यात सामाजिक अंतर राखा असे आवाहन करÞण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत आता परळच्या टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठ्याची मुदत संपणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात केवळ २० दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती शासनाने दिली आहे.

टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील सुमारे १०० युनिट्स रक्तसाठ्याची मुदत संपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याखेरीज, आणखी १०० युनिट रक्तसाठ्याची मुदतही संपण्याच्या प्रक्रियेत आहे. या रक्तपेढीतील‘ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे ५० युनिट्स व ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे ४० युनिट्सची मुदत १२ एप्रिल रोजी संपणार आहे. तसेच, ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या एकूण ११० युनिटची मुदत ५ एप्रिलला संपली आहे. त्यामुळे जवळपास २०५ युनिट रक्तसाठ्याची मुदत संपली आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले, कोणत्याही रक्तसाठ्याची मुदत संपलेली नाही. वेळोवेळी रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती संबंधित यंत्रणांकडून घेतली जात आहे. याखेरीज, टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रान्सफ्युजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रक्तसाठ्याची मुदत संपल्याचे वृत्त फेटाळले आहे.

व्हॉट्सअप ग्रुपमधून समजतेय रक्ताची उपलब्धतालॉकडाऊनच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी येण्यात अडचणी येऊ नयेत,यासाठी पोलीस व जिल्हाधिकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार व्हॉटसअप ग्रुपवर रक्तपेढीकडून अद्ययावत माहिती उपलब्ध होत आहे. रक्तपेढ्यांकडे पुढील २० दिवस रक्तपुरवठा करता येईल इतका साठा उपलब्ध आहे. रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :रक्तपेढी