मॉर्निंग वॉकला अडथळा
By Admin | Updated: March 29, 2015 22:26 IST2015-03-29T22:26:25+5:302015-03-29T22:26:25+5:30
येथील अनेक ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी ऐतिहासिक पुलावरून जुन्या नागोठणे - रोहे रस्त्यामार्गे एमआयडीसी फाट्यापर्यंत नित्यनेमाने जातात

मॉर्निंग वॉकला अडथळा
नागोठणे : येथील अनेक ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी ऐतिहासिक पुलावरून जुन्या नागोठणे - रोहे रस्त्यामार्गे एमआयडीसी फाट्यापर्यंत नित्यनेमाने जातात. मात्र मागील तीन वर्षांपासून हा दीड किलोमीटर रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे.
या रस्त्यावर दुचाकी वाहने सोडली तर मोठी वाहने जवळपास चालतच नसल्याने या रस्त्यावरून चालत जाणे ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे वाटत असले तरी या खड्डेमय रस्त्यावरून चालणे त्यांच्यासाठी जिकरीचे होत आहे. आमचे हात-पाय मोडल्यावरच बांधकाम खात्याला रस्त्याचे खड्डे भरण्याची सुबुद्धी सुचेल का? असा सवाल नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मामा शहासने यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)