गावठी, दमण दारूसाठी सीमेवर नाकाबंदी

By Admin | Updated: December 21, 2014 23:30 IST2014-12-21T23:30:04+5:302014-12-21T23:30:04+5:30

राज्य उत्पादन शुल्क विरार तसेच सीमा भागातील पोलीस चेकनाक्यावर नाकाबंदी करून वहाने तपासण्याबरोबर मुंबई, अहमदनगर हायवेलगतव्या सर्व आणि लहान हॉटेलवर पोलिसांची करडी नजर आहे.

Blockade on the boundary for village, Daman drunk | गावठी, दमण दारूसाठी सीमेवर नाकाबंदी

गावठी, दमण दारूसाठी सीमेवर नाकाबंदी

डहाणू : नवीन वर्षाच्या निमित्ताने गावठी व दमण निर्मित मद्याचा साठा पालघर, ठाणे जिल्ह्यात येण्याची शक्यता असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून राज्य उत्पादन शुल्क विरार तसेच सीमा भागातील पोलीस चेकनाक्यावर नाकाबंदी करून वहाने तपासण्याबरोबर मुंबई, अहमदनगर हायवेलगतव्या सर्व आणि लहान हॉटेलवर पोलिसांची करडी नजर आहे.
येऊ घातलेल्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर डहाणू, बोईसर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येणाऱ्या वाणगांव, डहाणू, घोलवड, कासा अंतर्गत सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी सज्ज झाल्याची माहिती येथील पोलीस अधिकारी अभिजीत शिवतरे यांनी दिली.
ख्रिसमस तसेच सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे, पुणे तसेच गुजरात राज्यातील बलसाड, वापी, सुरत या भागांतील हजारो पर्यटक डहाणू, बोर्डी, झाई, चिंचणी, वरोर, महालक्ष्मी येथील समुद्रकिनारी येत असतात. डहाणूत येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता आणि सेलिब्रेशनला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांमार्फत सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हायवेलगतच्या गावात दमणनिर्मित दारुचा साठा पकडला होता. ही दारू जिल्ह्यात विक्रीसाठी आणली होती. विशेष म्हणजे थर्टीफस्ट डिसेंबरच्या दिवशी दमण दारुला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने दमण तसेच गावठी दारूचा साठा याच कालावधीत येत असतो. त्यामुळे डहाणू पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने बोर्डी, उधवा, झाई, आमगाव, चारोटी तसेच हायवेलगत जागोजागी नाकाबंदी सुरू केली आहे. शिवाय सीमालगतच्या नेहमीच्या ठिकाणच्या जागा वगळता इतर ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस पथक नेमले आहे.
नाताळ व थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी सर्वात जास्त पर्यटक डहाणू, बोर्डी, येथे येत असल्याने हा परिसर गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच दमण दारू रोखण्यासाठी भिलारी नाका, वेवजी, कोसबाड, झाई, रामपूर, आशागड, डहाणू या भागात सातत्याने नाकाबंदी करून वहाने तपासली जात असल्याचे पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे तसेच बी. डब्ल्यू बांगर यांनी सांगितले.
(वार्ताहर)

Web Title: Blockade on the boundary for village, Daman drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.