Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर, मध्य रेल्वे लाईनवर पूर्वसूचना न देताच ब्लॉक; प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 14:22 IST

हार्बरवर 11 वाजल्यापासून लोकल गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबई : गेल्या अर्ध्या तासापासून हार्बर लाईनवर लोकल सेवा ठप्प झाली असून ऐन उन्हाळ्यामध्ये गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तर कल्याण-उल्हासनगरमध्येही लोकल वाहतूक थांबविण्यात आली आहे.  मात्र, मध्ये रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेतल्याचे समोर येत आहे. 

हार्बरवर 11 वाजल्यापासून लोकल गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे तांत्रिक बिघाड असण्य़ाची शक्यता होती. काही वृत्तवाहिन्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती. शेवटी मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेतल्याचे समोर आले आहे. 

मध्य रेल्वेच्या या सावळ्या गोंधळामुळे ऐन उष्णतेच्या काळात प्रवाशांना लोकलमध्येच ताटकळत थांबावे लागले आहे. 

टॅग्स :हार्बर रेल्वेमुंबई ट्रेन अपडेट