माटुंगा-मुलुंड मार्गावर ब्लॉक
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-12T00:26:10+5:302014-07-12T00:26:10+5:30
माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला अन् वडाळा रोड-माहीम दोन्ही दिशांवर मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार असून तो सकाळी 11 ते दु. 3.3क् या वेळेत असेल.

माटुंगा-मुलुंड मार्गावर ब्लॉक
ठाणो : माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला अन् वडाळा रोड-माहीम दोन्ही दिशांवर मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार असून तो सकाळी 11 ते दु. 3.3क् या वेळेत असेल.
या कालावधीत मुख्य मार्गावरील सर्व गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावर धावणार असून त्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप यासह मुलुंड स्थानकांत थांबतील. केवळ फलाटांअभावी त्या विद्याविहार, नाहूर स्थानकांमध्ये थांबणार नाहीत. मुलुंडनंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावरून सोडण्यात येतील.
हार्बरच्या कुर्ला-सीएसटी अप मार्गावर आणि वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर मेगाब्लॉक घेणार आहे. सीएसटी-कुर्ला अप मार्गावर पनवेल, बेलापूर, वाशी येथून आलेल्या लोकल या कुर्ला-भायखळा मुख्य मार्गाच्या जलद दिशेवरून धावतील. परिणामी, त्या गाडय़ा चिंचपोकळी, करी रोड स्थानकांत थांबणार नाहीत. पुन्हा त्या धीम्या मार्गावरून सीएसटीला जातील. सकाळी 1क्.2क् ते दु. 3.33 या कालावधीत सीएसटी-बांद्रा या अप-डाऊन मार्गावरून सुटणा:या लोकल रद्द केल्या आहेत. (प्रतिनिधी)
गाडय़ा स्लो ट्रॅकवर
ठाणो - सिग्नलसह रेल्वेरूळ आदींची अभियांत्रिकी कामे आणि देखभालीच्या कारणास्तव सांताक्रूझ-गोरेगाव जलद मार्गावर रविवारी सकाळी 1क्.35 ते दु. 3.35 या कालावधीत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत गाडय़ा धीम्यागती मार्गावर वळवण्यात येणार आहेत.