Join us

ब्लॅकमेल करून विद्यार्थिनीचा विनयभंग! एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:59 IST

१६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धमकावत तिचा विनयभंग करणाºया एका विवाहित व्यक्तीला विलेपार्ले पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले. गोरेगावमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून...

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई  - १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धमकावत तिचा विनयभंग करणाºया एका विवाहित व्यक्तीला विलेपार्ले पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले. गोरेगावमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, या प्रकरणी त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विलेपार्ले परिसरात पीडित विद्यार्थिनी सीमा (नावात बदल) तिच्या पालकांसोबत राहते. घरची परिस्थिती बिकट असल्याने तिचे आई आणि वडील दोघेही काम करतात. सीमा कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात कला शाखेत शिकत आहे. अटक आरोपी हा विवाहित असून, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. सीमाच्या वडिलांशी त्याचे घरच्यासारखे संबंध होते. त्यामुळे त्याचे सीमाच्या घरी वरचेवर येणे-जाणे व्हायचे. १४ फेब्रुवारीला त्याने सीमाशी मैत्री केली. त्यानंतर, या मैत्रीचा फायदा उचलून १७ फेब्रुवारीला तिच्यासोबत त्याने अश्लील चाळे केले. त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांना नुकसान पोहोचवीन, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने कोणालाच याबाबत सांगितले नाही. मात्र, आरोपीचा अत्याचार वाढत असल्याने तिने याबाबत आईला विश्वासात घेतले आणि घडलेला प्रकार सांगितला.घडलेला प्रकार ऐकू नतिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने मुलीसह विलेपार्ले पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. या प्रकरणी सीमाचा जबाब नोंदवत ७ मार्च, २०१८ रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याच्या दुसºयाच दिवशी गोरेगावमधून आरोपीला अटक केली, अशी माहिती विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :महिलामुंबईगुन्हा