जोडप्यांना ब्लॅकमेलिंग करून लुबाडण्याचे प्रकार

By Admin | Updated: July 13, 2014 23:18 IST2014-07-13T23:18:00+5:302014-07-13T23:18:00+5:30

खारघर वसाहतीत एका लग्न जमलेल्या जोडप्याला पोलीसांनी लुटल्याची घटना ताजी आहे.

Blackmail by Blackmailing Couples | जोडप्यांना ब्लॅकमेलिंग करून लुबाडण्याचे प्रकार

जोडप्यांना ब्लॅकमेलिंग करून लुबाडण्याचे प्रकार

पनवेल : खारघर वसाहतीत एका लग्न जमलेल्या जोडप्याला पोलीसांनी लुटल्याची घटना ताजी आहे. असे असताना खारघर वाहतुक पोलीस त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जोडप्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धंदा करीत आहेत. त्याकरीता ते मॉलसमोर फिल्डींग लावून असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र उगाचाच पोलीसांबरोबर पंगा नको म्हणूून तक्रार करण्यास कोणी पुढे धजावत नाही.
कळंबोली सर्कलपासून ते वाशीपर्यंत चालू गाडयांना क्रेन लावून परराज्यातील वाहनांना लुटण्याचे प्रकार घडताहेत. खारघरमध्येही वाहतुक कोंडी फोडण्यास प्राधान्य न देता फक्त वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे वसुल करण्याचे काम सुरू आहे. मोठया प्रमाणात दुचाकी उचलून हजारो रूपयांचा मलिदा गोळा करण्याचे काम सायबर सिटीत सुरू आहे. अवजड वाहने मॅजिकवाल्यांकडून हजारो रूपये हप्ते घेऊन महिन्याला लाखो रूपयांचे टार्गेट ठेवणारे खारघर वाहतुक शाखेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे कमी पडत आहे की काय आता ते जोडप्यांना टार्गेट करू लागले आहेत.चारचाकी वाहनांजवळ जावून काय चालले आहे आतमध्ये , ही पब्लिक स्पेस आहे तुम्हाला समजते का चला तुम्ही पोलीस स्टेशनला अशा शब्दात धमकावत असल्याचे एका जोडप्याने सांगितले. पोलीस स्टेशनची झंजट नको म्हणून साहेब जाऊद्या ना तुमचे चहापाणी घ्या अशी विनवणी अनेकजण करतात.

Web Title: Blackmail by Blackmailing Couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.