काळा बाजार करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’
By Admin | Updated: July 30, 2015 02:45 IST2015-07-30T02:45:47+5:302015-07-30T02:45:47+5:30
वाळूतस्करी आणि काळाबाजार करून बाजारपेठेत कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर समाज विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्याची तरतूद

काळा बाजार करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’
मुंबई : वाळूतस्करी आणि काळाबाजार करून बाजारपेठेत कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर समाज विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्याची तरतूद असलेले सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे आता झोपडीदादा, हातभट्टीवाले औषध भेसळ करणारे, धोकादायक व्यक्ती, व्हिडीओ पायरसीसारखे कृत्य करणाऱ्या व्यक्तींसोबतच वाळूतस्कर आणि काळाबाजार करणाऱ्यांवरही एमपीडीएअंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
वाळूतस्कारांच्या वाढलेल्या कारवाया, कर्मचारी, अधिकाऱ्यांवर या तस्करांनी केलेले हल्ले या पार्श्वभूमीवर हे पाऊल सरकारने उचलले आहे. (विशेष प्रतिनिधी)