‘अर्सेनिक अल्बम’चा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:44 AM2020-06-01T00:44:33+5:302020-06-01T00:44:40+5:30

तुटवडा : प्लास्टिकच्या बाटल्या, साखरेच्या गोळ्या, औषधाची किंमत दुप्पट

Black market for arsenic albums | ‘अर्सेनिक अल्बम’चा काळाबाजार

‘अर्सेनिक अल्बम’चा काळाबाजार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वत्र अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधाच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने त्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या औषधासाठी लागण्याऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या (व्हॉयल), साबुदाण्यासाररख्या दिसणाºया साखरेच्या गोळ्या (ग्लोब्युल्स) आणि प्रत्यक्ष औषध यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. अनेक होमिओपॅथी डॉक्टरांना हा कच्चा माल उपलब्ध होत नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.


अर्सेनिक अल्बम हे द्रवरूपातील औषध भारतासह जर्मन कंपन्याही तयार करतात. जर्मन कंपन्यांचा दर ३० मिली लीटरसाठी २७५ ते २९५ रुपये आहे. तर भारतीय कंपन्या १७५ ते १९५ रुपये आकारतात. सध्या जर्मनीहून होणारा पुरवठा बंद असून भारतीय कंपन्यांतील निर्मितीसुद्धा लॉकडाउनमुळे रोडावली होती.
मागणी झपाट्याने वाढल्याने या औषधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याची माहिती डॉ. अरविंद पांडे यांनी दिली. ज्यांच्याकडे या औषधाचा साठा आहे ते ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकारून औषधांची विक्री करत आहेत.


त्यामुळे माझ्यासह अनेक डॉक्टरांना हे औषधच उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, थेट द्रवरूपात औषध घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळेही या तुटवड्यात वाढ होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


औषधासाठी अर्धा एक, आणि दोन ड्रम साइजच्या व्हॉयल लागतात. दोन ड्रम साइजच्या बाटल्यांमध्ये कुटुंबातील ६ जणांना पुरतील एवढ्या औषधाच्या गोळ्या देता येतात.
काही महिन्यांपूर्वी ८० पैसे ते एक रुपयाला एक या दरात त्या मिळायच्या. मात्र, लॉकडाउनमुळे अनेक प्लास्टिक उत्पादनांचे कारखाने बंद असल्याने त्यांचाही तुटवडा आहे. सध्या जिथे निर्मितीला परवानगी आहे तिथे दीड ते दोन रुपये दराने विक्री होत आहे. औषध तयार करण्यासाठी ज्या साबुदाण्यासारख्या दिसणाºया साखरेच्या छोट्या गोळ्या वापरल्या जातात त्या त्यांच्या आकारानुसार प्रति किलो १७५ ते २०० रुपयांना मिळायच्या. त्यांची किंमत आता ४०० रुपयांवर झेपावल्याची माहिती डॉक्टरांकडून हाती आली आहे.

व्हॉयलची पळवापळवी?
ठाण्यात सामाजिक कार्य करणाºया एका संस्थेने वसई येथील प्लास्टिक कारखान्यात १० हजार बाटल्यांची आॅर्डर दिली होती. मात्र, संस्थेचे कार्यकर्ते तिथे पोहोचण्यापूर्वीच एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या बाटल्या खरेदी केल्या. त्यामुळे आम्हाला चार हजार बाटल्याच उपलब्ध झाल्याचे या कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


परिस्थिती लवकरच सुधारेल
अर्सेनिक अल्बम औषध आणि त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल यांचा तुटवडा असला तरी उत्पादन प्रक्रियेला सध्या जोमाने सुरुवातझाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही तूट भरून निघेल अशी आशा ठाण्यातील एका प्रथितयश डॉक्टरांनी दिली. तुटवडा निर्माण झाला की, भाववाढ होते. हा मानवी स्वभावच असल्याचे मतही त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

Web Title: Black market for arsenic albums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.