भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST2021-07-29T04:06:44+5:302021-07-29T04:06:44+5:30

मुंबई : कोकणातील पूरग्रस्तांसाठी प्रदेश भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे १५०० कुटुंबांसाठीचे मदत साहित्य बुधवारी रवाना करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय ...

BJP's North Indian Front sends relief materials to flood victims | भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना

भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना

मुंबई : कोकणातील पूरग्रस्तांसाठी प्रदेश भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे १५०० कुटुंबांसाठीचे मदत साहित्य बुधवारी रवाना करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मदतीचा ट्रक रवाना करण्यात आला.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष राज पुरोहित, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय पांडे, संतोष सिंग, ब्रिजेश सिंग आदी उपस्थित होते. कोकणातील स्थिती अत्यंत भीषण आहे. अशा काळात उत्तर भारतीय मोर्चाने आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करून आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिल्याचे आशिष शेलार म्हणाले. तर, संकटकाळात आपल्या बांधवांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, या भावनेतून मदत साहित्य कोकणात पाठविले जात आहे. १५०० कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा वस्तू, घरावर बसविण्यासाठीचे पत्रे, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आदी वस्तूंचा मदत साहित्यात समावेश आहे, असे संजय पांडे यांनी सांगितले.

Web Title: BJP's North Indian Front sends relief materials to flood victims