भाजपाचे मोहित कुंभोज सर्वात श्रीमंत उमेदवार

By Admin | Updated: October 4, 2014 02:16 IST2014-10-04T02:16:52+5:302014-10-04T02:16:52+5:30

मुंबईत दिंडोशी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने रिंगणात उतरविलेले मोहित कुंभोज हे आगामी विधानसभा निवडणूक लढविणा:या 4,117 उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

BJP's Mohit Kumbhoz is the richest candidate | भाजपाचे मोहित कुंभोज सर्वात श्रीमंत उमेदवार

भाजपाचे मोहित कुंभोज सर्वात श्रीमंत उमेदवार

>मुंबई : मुंबईत दिंडोशी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने रिंगणात उतरविलेले मोहित कुंभोज हे आगामी विधानसभा निवडणूक लढविणा:या 4,117 उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
3क् वर्षाच्या कुंभोज यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रनुसार त्यांची एकूण मालमत्ता 353 कोटी 53 लाख रुपये आहे. 2क्क्3मध्ये बी.कॉम.चे पहिले वर्ष उत्तीर्ण झालेले कुंभोज बांधकाम व सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्री व्यवसायात आहेत. निवडणूक लढविणारे दुस:या क्रमांकाचे उमेदवारही भारतीय जनता पार्टीचेच आहेत. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविणारे मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिज्ञापत्रत स्वत:ची मालमत्ता 198 कोटी 61 लाख रुपये दाखविली आहे. पदवीधर असलेले लोढा मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष अबू आझमी श्रीमंत उमेदवारांच्या यादीत तिस:या क्रमांकावर आहेत. 
मुंबईत मानखुर्दमधून निवडणूक लढविणा:या आझमी यांनी 156 कोटी 11 लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. केवळ 15,934 रुपये मालमत्ता जाहीर केलेले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किडापल्ली नारायणन केशव हे सर्वात गरीब उमेदवार आहेत. 46 वर्षाचे केशव अंधेरी (प.) मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: BJP's Mohit Kumbhoz is the richest candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.