Join us

दहिसरमध्ये भाजपाचं घर घर चलो संपर्क अभियान; खा.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते शुभारंभ

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 5, 2024 18:34 IST

उत्तर मुंबई भाजप सर्व नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घर घर संपर्क अभियान अंतर्गत मैदानात उतरले असल्याचे गणेश खणकर यांनी सांगितले

मुंबई-दहिसरच्या भाजप आमदार मनिषा चौधरी यांच्या कार्यालयातून घर घर चलो संपर्क अभियानाचा शुभारंभ खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.येथील मोती नगर बिल्डिंगमध्ये घर घर चलो संपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना रोज तीन तास सकाळ संध्याकाळ घरो घरी फिरून नागरिकांपर्यंत मोदी सरकार तसेच राज्य सरकारची कामे आणि अहवाल पोहचविण्याचे त्यांनी आवाहन केले.

या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मण्डल अध्यक्ष अरविंद यादव, सर्व माजी नगरसेवक, नीला सोनी राठोड, युवा मोर्चा अध्यक्ष अमर शाह आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रची एक संघटनात्मक पातळीवर आभासी बैठक प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप  अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांनी गेल्या  शनिवारी रात्री घेतली होती.

उत्तर मुंबई भाजप सर्व नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घर घर संपर्क अभियान अंतर्गत मैदानात उतरले असल्याचे गणेश खणकर यांनी सांगितले. आम्ही केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारची सर्व विकास कामे लिखित स्वरूपात पत्रक घेऊन मतदाता पर्यंत पोचणार आहोत. या साठी उत्तर मुंबई जोमाने कामाला लागला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

उद्घाटनानंतर नीला बेन सोनी राठोड आणि माजी नगरसेवक हरीश छेडा यांनी वॉर्ड ८, बूथ १९२ येथे सदा सहायीनी इमारतीत घर घर चलो संपर्क अभियानातर्गत ३० घरांशी संपर्क साधला.

टॅग्स :भाजपा