राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष

By Admin | Updated: September 19, 2014 03:07 IST2014-09-19T03:07:42+5:302014-09-19T03:07:42+5:30

आमदार राम कदम यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरसह ईशान्य मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिका:यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

BJP's dissatisfaction with Ram Kadam's entry | राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष

राम कदमांच्या एन्ट्रीमुळे भाजपात असंतोष

मुंबई : आमदार राम कदम यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरसह ईशान्य मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिका:यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या, पक्षाला न जुमानता आत्मकेंद्री राजकारण करणा:या कदमांना स्वीकारण्याआधी आपल्याला अंधारात ठेवल्याचा आरोप पदाधिका:यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. हा निर्णय येत्या निवडणुकीत पक्षाला जड जाईल, अशी टोकाची भावना या पदाधिका:यांकडून व्यक्त होत आहे.
  गेल्या काही दिवसांपासून राजकीय आo्रय शोधणा:या कदम यांना भाजपाने स्वीकारले. पुण्यातील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत कदम यांनी भाजपात प्रवेश केला. येत्या निवडणुकीत ते घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपातर्फे लढण्याची दाट शक्यता आहे. 
या घडामोडीमुळे घाटकोपर पश्चिमसह संपूर्ण ईशान्य मुंबईतील भाजपाचे पदाधिकारी अस्वस्थ आणि संतापलेले आहेत. कालर्पयत ही अफवा आहे, कदम यांचा विषयच नाही, असे पक्षप्रमुखांकडून सांगण्यात येत होते. मात्र आज दुपारी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कदम यांच्या पक्षप्रवेशाची माहिती 
मिळाली आणि सर्वानाच धक्का बसला, असे एका स्थानिक पदाधिका:याने सांगितले. स्थानिक पदाधिका:यांना विश्वासात घेतल्याशिवाय भाजपात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र कदम यांच्या बाबतीत हा नियम अपवाद ठरला, याचे आश्चर्य वाटत असल्याचे त्याने पुढे स्पष्ट केले. 
आमदार म्हणून कदम यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघात एकही पायाभूत सुविधा किंवा जनहितार्थ उपक्रम राबविला नाही. कोणताही विकास प्रकल्प या मतदारसंघात आला नाही. देवदर्शन घडवून, राख्या बांधून घेऊन किंवा संत असल्याचे भासवून ते फक्त दिशाभूल करीत आहेत, हे वास्तव आम्ही जनतेर्पयत नेले. पण उद्या याच कदमांचा प्रचार केल्यास जनता आम्हाला माफ करेल का, ही जनता भाजपाला मतदान करेल का, असा सवालही एका पदाधिका:याने विचारला. कदम यांच्या भाजपा एन्ट्रीपूर्वी पक्षाचे महामंत्री विनायक कामत यांचे नाव उमेदवार म्हणून आघाडीवर होते. ‘निर्णयानंतर चर्चा कसली? पक्षादेश मान्य,’ अशी सूचक प्रतिक्रिया कामत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कदम यांना उमेदवारी मिळाल्यास घाटकोपर पश्चिम आणि जिल्हास्तरावरील अनेक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. (प्रतिनिधी)
 
कदमांना आणणारा कोण?
कदम यांना भाजपात आणणारा कोण? राष्ट्रीय, राज्य किंवा शहर पातळीवरील नेत्यांनी स्थानिक पातळीवर कोणत्या नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला, याचा शोध भाजपा पदाधिका:यांनी सुरू केला आहे. या गडबडीत मुंबईतील एक खासदार आणि एका आमदारावर भाजपा पदाधिका:यांचा संशय असल्याचे समजते.
 
फरक नाही
कदम यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काडीचाही फरक पडणार नाही. घाटकोपर पश्चिम हा मनसेचाच गड होता आणि राहील. कार्यकर्ते मनसेसोबतच राहतील, असे मनसे विभागअध्यक्ष दिलीप लांडे  यांनी सांगितले.
 
शिवसेनाही विरोधात
स्थानिक शिवसैनिकांनीही कदम यांच्या भाजपाप्रवेशाचा निषेध केला आहे. कदम आणि शिवसैनिकांमध्ये अनेकदा खटकेही उडाले होते. दहीहंडीच्या वेळी कदम यांनी शिवसैनिकांना शिव्या हासडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे विभागप्रमुख सुधीर मोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कदम यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. शिवसैनिकांची भावना उद्धव ठाकरे यांच्यार्पयत पोहचवण्यात येईल. त्यांच्या आदेशानुसार कृती करू, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी व्यक्त केली.
 
भाजप कोअर कमिटीची बैठक रद्द : तयारीचा आढावा घेण्यासाठी आज घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार होती. मात्र कदम यांच्या प्रवेशामुळे या बैठकीकडे पदाधिका:यांनी पाठ फिरवली. परिणामी बैठक रद्द झाल्याची माहिती सूत्रंकडून मिळते.

 

Web Title: BJP's dissatisfaction with Ram Kadam's entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.