Join us  

शेतकरी कर्जमाफीसाठी भाजपचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 5:00 AM

२२ जूनपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबई : राज्य सरकारने ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी प्रदेश भाजपच्या वतीने २२ जूनपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणे या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प आहे. त्यामुळे भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रसंगी स्वत: कर्ज उभारणी करावी, पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपाची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकºयांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल.पीककर्ज मागणाºया शेतकºयांचा बँकांमध्ये वारंवार अपमान होत आहे, दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने २२ मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकºयांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही, याची कबुली देऊन शासनाच्या नावे कर्ज मांडावे, असे बँकांना सांगितले. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. दोन लाखांवर कर्ज असणाºयांसाठी ओटीएसचा आणि नियमित कर्ज भरणाºयांस प्रोत्साहन अनुदानाचा आदेश निघाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ‘कर्जवितरणाबाबत तक्रारी नकोत’ या इशाºयाला बँका जुमानत नाहीत, असा भाजपचा आरोप आहे.

टॅग्स :भाजपा