विक्रमगडमध्ये भाजपा विजयी
By Admin | Updated: January 30, 2015 23:59 IST2015-01-30T23:59:16+5:302015-01-30T23:59:16+5:30
क्रमगड पंचायत समितीच्या १० गणापैकी ६ गणात तर जिल्हा परिषदेच्या ५ गटापैकी ४ गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले

विक्रमगडमध्ये भाजपा विजयी
विक्रमगड पंचायत समितीच्या १० गणापैकी ६ गणात तर जिल्हा परिषदेच्या ५ गटापैकी ४ गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले असून विक्रमगड पंचायत समितीवर भाजपाने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. विक्रमगड तालुक्यातील जि. प. च्या पाच गटापैकी आलोंडे गटात भाजपाच्या दर्शना शांताराम दुमाडे - ३८४२, दादडे गटात भाजपाच्या सुनिता बाबू चोथे - ३९०६, उटावली गटात भाजपाच्या सिंधू अजित भोये - ५२८४, वेहेलपाडा गटात भाजपाच्या प्रमिला भाऊ काकड - ३१४७ या भाजपाच्या चार महिला उमेदवार विजयी झाले असून कुर्झे गटात शिवसेनेच्या वैष्णवी विनोद राहणे - ३५९७ मतांनी विजयी झाल्या आहेत.पंचायत समितीच्या दहा गणापैकी आलोंडे गणात भाजपाच्या जिजाबाई निशिकांत टोपले १८७०, विक्रमगड गणात भाजपाचे मधुकर धर्मा खुताडे - २४१७, उटावली गणात भाजपाच्या हिरा गोपाळ खांजोडे - २८६५, जांभा गणात भाजपाच्या इंदिरा बाळू मिसाळा - २१४९, वेहेलपाडा गणात भाजपाच्या पार्वती चिंतामण टोपले - २२५४, चिंचघर गणात भाजपाचे विष्णू शांताराम धिंडा - १६९९, भाजपाचे सहा उमेदवार विजयी झाले असून करसूड गणात शिवसेनेचे दिनेश बाबू पागी - १५०६, कुर्झे गणात शिवसेनेचे विजय मधुकर वेखंडे - २०२६, हे शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले असून दादडे गणात माकपच्या वंदना विलास गहला - १८५८ तर तलवाडा गणात राष्ट्रवादीचे रमेश रामचंद्र दोडे - १७०७ मतांनी विजयी झाले आहेत.