Join us  

भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सायकलने करणार गावागावात प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 6:06 AM

भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, सायकलद्वारे कमलदूत प्रचार मोहीम राबविण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

संतोष ठाकूर 

नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी सायकलवरून प्रचार करण्याची अभिनव योजना आखली आहे. सायकल चालविणाºया कार्यकर्त्याला भाजपने ‘कमलदूत’ असे नाव दिले आहे. भाजपचे निवडणूक वायदे आणि घोषणा याद्वारे गावागावात पोहोचविल्या जातील. भाजपला का निवडून द्यायचे, याची माहिती कमलदूत गावकऱ्यांना देईल.

भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, सायकलद्वारे कमलदूत प्रचार मोहीम राबविण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे जेथे चारचाकी वाहने पोहोचत नाहीत, तेथे सायकल सहजपणे जाईल. दुसरे म्हणजे याद्वारे प्रत्येक घराच्या दरवाजापर्यंत पोहोचले जाऊ शकते. लोकांशी जोडून घेण्यासाठी अधिक बळ त्यातून मिळेल. अन्य एका पदाधिकाºयाने सांगितले की, सुरुवातीला दोन्ही राज्यांत पाचशे सायकली पाठविल्या जातील. या सायकली भाड्याने घेतल्या जातील. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सायकलीही उपयोगात आणल्या जातील. सर्व सायकली मात्र एकाच प्रकारच्या प्रचार ब्रँडिंगने सुसज्ज असतील. सर्व सायकलींच्या मागच्या चाकाच्या वर बोेर्ड असतील. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असेल. सायकलीवर माईकही असेल. त्याद्वारे कमलदूत स्वत: प्रचार करील, तसेच भाजपची प्रचार गीतेही त्यावरून वाजविली जातील. 

टॅग्स :भाजपाविधानसभानिवडणूक