भाजपचा दक्षिण भारतीय अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:26+5:302014-10-03T22:56:26+5:30
सुपरवोट....

भाजपचा दक्षिण भारतीय अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
स परवोट.......................................भाजपचा दक्षिण भारतीय अपक्ष उमेदवाराला पाठिंबाचांदिवलीत एस. अण्णामलई कोणाचे गणित बिघडवणार?मुंबई: चांदिवली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपा आता अपक्ष उमेदवार एस. अण्णामलई यांना पाठिंबा देणार आहे. अण्णामलई हे काँग्रेस समर्थक तसेच माजी खासदार प्रिया दत्त यांचे निकटचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजपची ही खेळी आता चांदिवलीत कोणाला भोवणार आणि कोणाच्या फायद्याची ठरणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. मुस्लिम बहुल मतदारसंघ अशी ओळख असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला यंदा मात्र चहूबाजुने घेेरला गेला आहे. शिवसेना-भाजपची झालेली ताटातूट आणि आघाडीची विस्कळीत झालेली घडी पाहता आता चांदिवलीत काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. या मतदार संघातील भाजपचे उमेदवार सीताराम तिवारी यांचा अर्ज बाद झाल्याने समीकरणे काहीप्रमाणात का होईना निश्चित बदललेली आहेत. तिवारींचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजप कोणाच्या पाठिशी उभी राहणार हे महत्त्वाचे होते. त्यात भाजपने महायुतीचा घटक असलेल्या रिपाइंच्या उमेदवाराला चांदिवलीत पाठिंबा न देता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जरीमरीतील अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले अण्णामलई यांना पाठिंबा दिल्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अण्णामलई हे सुरुवातीला अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी काँग्रेसला मधल्या काळात चांगली साथ दिली. परंतु, गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना तिकीट न मिळाल्याने ते कमालीचे नाराज होते. अपक्ष म्हणून लढून देखील अण्णामलईंच्या पत्नी प्रभागातून निवडून आल्या. जरीमरीतील मुस्लिम बहुल भागात अण्णामलई हे समीकरण बदलू शकतात. शिवाय सुमारे २५ हजार दक्षिण भारतीय मत देखील या मतदारसंघात महत्त्वाची आहेत. भाजपची साथ लाभल्याने उत्तरभारतीय आणि गुजराती मते देखील त्यांच्याकडे वळू शकतात. सध्याच्या परिस्थितीत नसीम खान यांच्यासमोर मनसेच्या ईश्वर तायडे यांनी मोठे आव्हान उभे केलेले आहे. गेल्या विधानसभेत शिवसेना मनसेतील वादामुळे नसीम खान यांना फायदा झाला होता. पण यंदा सगळेच वेगवेगळे लढत आहेत. राष्ट्रवादी देखील काँग्रेसच्या धक्का देण्याच्या तयारीत आहे. अशात आता अण्णामलई सारख्या मातब्बर नेत्याला भाजपने दिलेला पाठिंबा अनेक उमेदवारांच्या पोटात गोळा आणणारा ठरणार हे मात्र नक्की आहे. (प्रतिनिधी)