Join us

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबईत, देवेंद्र फडणवीसांनी केलं खास ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 23:49 IST

नड्डांच्या उपस्थितीत होणार युवा संवाद कार्यक्रम

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, हे 17 व 18 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 18 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

या वेळी 10 वी आणि 12 वी नंतर काय? याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध स्टार्ट अपचे स्टॉल्स, व्यवसाय मार्गदर्शन विषयातील विविध स्टॉल्स, शैक्षणिक कर्ज पुरविणाऱ्या बँकांचे स्टॉल्स, पुस्तकांचे प्रदर्शन आणि व्यवसाय मार्गदर्शन विषयातील एक भव्य प्रदर्शनीचे दालन याठिकाणी उभारण्यात येणार आहे.अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

टॅग्स :जगत प्रकाश नड्डादेवेंद्र फडणवीसमुंबई