Join us

...अन् पहाटे ५ वाजता खासदारांना फोन केला; प्रवाशांच्या सुटकेसाठी तातडीनं मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 21:12 IST

आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे धावून आले खासदार

मनोहर कुंभेजकर

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावावर रविवारी पहाटे पांच वाजता आफ्रिकेतून आलेल्या एक प्रवाशाला मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर रिपोर्ट असून सुध्धा लसीचे दोन डोस घेतले नाही म्हणून त्रास देणे सुरू केले. हॉटेल मध्ये क्वारंटाईन तुमच्या खर्चाने व्हावे लागेल असे सांगण्यात आले.

मुंबई महानगर पालिकेत काम करणाऱ्या या प्रवाशाच्या आईची उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची ओळख देखील नव्हती. तिने पहाटे पांच वाजता त्यांना फोन केला, आणि एका सामान्य महिलेच्या मदतसाठी ते चक्क सहा वाजता वाजता एअरपोर्टवर उपस्थित राहून त्यांनी या प्रवाशांची सुटका केली. प्रवाशांच्या आई वडिलांनी सांगितले, आमच्याकडे पैसे नसून अधिकारी सांगतात त्या हॉटेलमध्ये आम्ही जाऊच शकत नाही. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, मग दहा हजार भरा तर आम्ही तुम्हाला मुक्त करतो. आता विरार वरून बसचे तिकीट काढून आलेल्या प्रवाशाच्या आईने दहा हजार भरायची क्षमता नाही म्हणून शंभर नंबरवर फोन केला, पण पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना सुद्धा फोन केला. मात्र तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही. रात्री साडे तीन वाजता परदेशातून मुलगा परततो आणि सकाळी पाचपर्यंत विमानतळवर अधिकारी सतवतात. 

या नंतर हवालदिल प्रवासी आणि त्यांचा आई वडिलांनी उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांना सकाळी ५ वाजता फोन केला. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात गंगेत एका आलेल्या अनोळखी फोन वर ते मदतीसाठी चक्क सकाळी सहा वाजता चक्क विमानतळावर धावून गेले. आणि मुद्दा मांडला की, जर दक्षिण आफ्रिका येथे लसीकरण सुरूच नाही झाले तर ते लस कसे घेऊ शकतात ? दुसरं त्यांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आहे, ते कोरोना निगेटिव्ह आहे. आणि त्यावर क्वारंटाईन करायचे तर त्यांना परवडणार तिथे जाऊ द्या. तुम्हीच नक्की केलेल्या महागड्या हॉटेल साठी का आग्रह का धरतात असा सवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. 

खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागरूकता मुळे महापालिका, पोलीस प्रशासन आणि विमानतळावर प्रवाशांना होत असलेला हा भयानक प्रकार उघडकीस आला. खा.गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले की, एक हेल्पलाईन सेंटर विमानतळ वर तात्काळ सुरु करण्यात यावे. महानगरपालिका जर सुरू करत  नसेल तर आम्ही भाजप पक्ष वतीने सुरू करु. मनपा आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांना पत्र देणार असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे हाल करू नका. त्यांची योग्य ती काळजी घ्या आणि प्रवाश्यांना पंच तारांकित हॉटेल मध्ये न पाठवता त्यांना बीकेसी येथील क्वारंटाईन सेंटरचा उपयोग करा.आणि या प्रवाश्याला त्रास देणाऱ्या संबधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभाजपा