Join us  

"माझ्या जीवाला धोका...", भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र; अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:14 AM

पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या जीवाला धोका असून, अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच दावा  प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात केला आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रसाद लाड यांनी हे पत्र ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. "कामगार क्षेत्रात काम करत असताना सातत्याने आलेल्या 2 धमक्यांची तक्रार, मा. पोलीस आयुक्त मुंबई व पोलीस खात्याच्या इतर प्रमुख अधिकाऱ्यांना केली आहे. माझी अपेक्षा आहे की, पोलीस प्रशासनाकडून याबाबत तात्काळ दखल घेतली जाईल, आणि माझ्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल सरकारकडून (प्रशासनाकडून) काळजी घेतली जाईल." असे ट्विट प्रसाद लाड यांनी केले आहे.

याचबरोबर, प्रसाद लाड यांनी आपल्या प्राप्त झालेल्या पत्रानुसार या पत्रात राहुल कंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड नामक व्यक्तीकडून मला जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. तसेच, माझ्या राहत्या घराजवळ व ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे मला जाणवले आहे. या सर्व घटनांबाबत सोबत जोडलेल्या पत्रांच्या माध्यमातुन रितसर माहिती देण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात यावी, अशी विनंती या पत्रामधून करण्यात आली आहे.

टॅग्स :प्रसाद लाडएकनाथ शिंदेमुंबई पोलीस