Join us  

'वेळेच्याआधी पोहचवून दाखवलं'; नितेश राणेंचा शिवसेना अन् महानगपालिकेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 1:39 PM

मुंबईत २०१९मध्ये ३५८ अपघाती मृत्यू झाले होते. तर, गेल्या वर्षी २६६ अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रस्ते अपघातांचे शहर ठरली आहे. चालू वर्षातील पहिल्या १० महिन्यांत राज्यातील सर्वाधिक अर्थात, १६६० रस्ते अपघात मुंबईत झाले आहेत. या अपघातांत २२७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४४२ प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र सर्वाधिक अपघात होत असतानादेखील अपघाती मृत्यूचा दर घटत असल्याचे दिलासादायक वास्तवही समोर आले आहे. 

मुंबईत २०१९मध्ये ३५८ अपघाती मृत्यू झाले होते. तर, गेल्या वर्षी २६६ अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. परिवहन आयुक्त व महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. रस्त्यांचे २७ हजार कोटी खिशात ओतून दाखवले अन् मुंबईला अपघातात क्रमांक १ करून दाखवले, असं म्हणत वेळेच्याआधी पोहचवून दाखवले, असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला आहे. 

राज्यात ऑक्टोबरअखेरीस २३,६२१ अपघातांची नोंद झाली असून यात २९,०३४ प्रवासी अपघातग्रस्त झाले. यात १० हजारांहून जण मृत्युमुखी पडले. तर, जखमींची संख्या १८ हजारांहून अधिक आहे. यानुसार रोज सरासरी ९६ नागरिक अपघातग्रस्त होत आहेत.

जिल्हा अपघात मृत्यू जखमी-

मुंबई शहर- १६६० २२७ १४४२

नाशिक ग्रामीण- ११६३ ७१२ ६५७

अहमदनगर- १०९३ ५८७ ६८२

पुणे ग्रामीण- १०९२ ६५५ ६५६

नागपूर शहर- ७६७ २१७ ७६४

ठाणे शहर- ६३६ १५८ ५७१

नवी मुंबई- ५८० २२४ ४६८

टॅग्स :शिवसेनामुंबई महानगरपालिकानीतेश राणे