Join us
Daily Top 2Weekly Top 5

...पण बाळासाहेबांचा शिवसैनिक विसरणार नाही; भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2024 17:48 IST

राम भक्तांना हरामखोर म्हणता? हा तर कोट्यवधी कारसेवकांचा अपमान आहे असा आरोप भाजपा नेते संजय पांडे यांनी ठाण्यात केला.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षाने जोमाने तयारीला लागलेत. भाजपाने राज्यातील २० जागांवर उमेदवार घोषित केलेत. महाविकास आघाडीचे जागावाटपही अंतिम टप्प्यात आलं आहे. उद्धव ठाकरे सातत्याने वेगवेगळ्या भागात दौरे करत भाजपाला टार्गेट करत आहेत. नुकतेच ठाकरेंनी भाजपाचा उल्लेख करत **खाऊ जनता पार्टी केला होता. त्याला भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांनी प्रत्युत्तर दिले. 

संजय पांडे म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतात, अलीकडेच एका सभेत उद्धव ठाकरेंनी जय श्रीराम नारे देणारे हरामखोर आहेत असं म्हटलं होते. हरामखोर जयश्रीराम म्हणणारा नाही तर कोण हरामखोर आहे हे तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत रामभक्त दाखवतील असं त्यांनी म्हटलं. ठाण्यात भाजपा उत्तर भारतीय मोर्चाची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत उद्धव ठाकरेंविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिल्या. 

तसेच राम भक्तांना हरामखोर म्हणता? हा तर कोट्यवधी कारसेवकांचा अपमान आहे. शरद पवारांच्या मांडीवर बसून तुम्ही हिंदुत्व विसरला असाल, पण बाळासाहेबांचे शिवसैनिक विसरणार नाही असं म्हणत संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख उद्धटराव असा केला.  

टॅग्स :उद्धव ठाकरे