Join us
Daily Top 2Weekly Top 5

'५० खोके'ला ५० 'ठोसे'ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:02 IST

अवमानामुळे विरोधी पक्ष संतप्त

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर '५० खोके, एकदम ओके' अशी टोलेबाजी उद्धवसेनेकडून शिंदेसेनेवर सातत्याने सुरू असून, आता अशा घोषणा झाल्यास त्याला '५० ठोसे' असे प्रत्युत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी महाविकास आघाडीला दिला. उद्धवसेनेच्या आरोपांवर भाजपने सभागृहात शिंदेसेनेची पाठराखण केली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा महापौरांच्या दालनात अवमान झाल्याचे पडसाद सभागृहात उमटले आणि विरोधकांनी सभात्याग केला.

महापौर रितू तावडे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बोलाविलेल्या बैठकीस विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर गेल्या असताना तेथे शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले आले.

'मातोश्री दोन' कशी उभी राहिली ? 

आमच्यावर खोक्यांचे आरोप होतात; परंतु तेव्हा कोणाच्या इशाऱ्यावरून खोके जात होते, असा प्रश्न शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांनी कोणाचेही नाव न घेता केला. मात्र 'मातोश्री दोन' कशी उभी राहिली, असा खोचक सवालही त्यांनी केला.

अवमानामुळे विरोधी पक्ष संतप्त

आमच्या नगरसेवकांबरोबर महापौरांशी काही चर्चा करायची आहे, असे सांगून घोले यांनी त्यांना महापौर दालनातील अँटी चेंबरमध्ये बसण्याची विनंती केली. काही वेळ बसल्यानंतर पेडणेकर बाहेर आल्या आणि सभागृहात गेल्या. तेथे पेडणेकर यांचा अवमान झाल्याचे सांगून मानापमान नाट्य रंगले.

सभा तहकुबीचा प्रस्ताव विरोधकांनी मांडल्यावर विरोधी पक्षनेत्यांचा अवमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मी फक्त त्यांना विनंती केली होती, असे घोले म्हणाले. पेडणेकर यांच्या अवमानामुळे विरोधी पक्ष संतप्त झाला आणि काँग्रेसचे गटनेते अश्श्रप आझमी यांनीही हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा दिला. उद्धवसेनेचे यशोधर फणसे यांनी पेडणेकर यांच्या अवमानाचा निषेध करीत सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. या मुद्द्यावर सभागृहात बराच गोंधळ झाला आणि विरोधकांनी सभात्याग केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP warns opposition: '50 slaps' for '50 boxes' taunts to Shinde camp.

Web Summary : BJP defends Shinde's faction against corruption allegations. A heated debate erupted after alleged disrespect towards opposition leader Kishori Pednekar. Opposition protested and staged a walkout.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकिशोरी पेडणेकररितू तावडे