भाजपाने केसाने गळा कापला - रिपाइंचा आरोप
By Admin | Updated: November 14, 2014 01:45 IST2014-11-14T01:45:45+5:302014-11-14T01:45:45+5:30
विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने युतीचा धर्म पाळला नसून केसाने गळा कापल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे यांनी केला आहे.

भाजपाने केसाने गळा कापला - रिपाइंचा आरोप
मुंबई : विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने युतीचा धर्म पाळला नसून केसाने गळा कापल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे यांनी केला आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते
बोलत होते.
भाजपासोबत युतीत सामील झालेल्या रिपाइंच्या वाटय़ाला निवडणुकांत 8 जागा आल्या होत्या. मात्र त्यातील एकाही जागेवर भाजपाने रिपाइंला मदत केली नाही. उलट प्रत्येक ठिकाणी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रिपाइंच्या उमेदवारांना पाडून केसाने गळा कापल्याचा आरोप ननावरे यांनी केला आहे.
शिवाय भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रिपाइंला सत्तेत 1क् टक्के वाटा देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या करारावर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सही केलेली आहे. मात्र भाजपा गरज संपल्यानंतर रिपाइंला सत्तेत वाटा देण्यात टाळाटाळ
करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपाने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर रिपाइं यापुढे संघटन करून निवडणुकांना एकटय़ाने सामोरे जाईल, असा इशाराही ननावरे यांनी या वेळी दिला आहे. (प्रतिनिधी)