Join us  

Chitra Wagh: 'रडायचं नाही...भिडायचं', चित्रा वाघ पारनेरच्या महिला तहसिलदारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:38 AM

Chitra Wagh: भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली.

Chitra Wagh: भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत ज्योती देवरे यांनी सुसाईड ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. निलेश लंके यांनी ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचारा आरोप केला आहे. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

चित्रा वाघ यांनी याच पार्श्वभूमीवर ज्योती देवरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ज्योत देवरे यांना 'रडने का नही, भिडने का' म्हणत पाठिंबा दिला आहे. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि आपण लढू व जिंकू असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आम्ही सर्व जण ज्योतीताईंच्या ठामपणे पाठिशी उभे आहोत असं सांगत चित्रा वाघ यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं आहे. 

दरम्यान, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतचे सर्व पुरावे आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले आहेत. या प्रकरणी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, पण असे अधिकारी तालुक्यात नकोत, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली आहे. त्यामुळे देवरे यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी स्वत:च्या आवाजातील क्लिप शुक्रवारी प्रसारीत झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यात आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आमदार लंके यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने व्यथित होऊन त्यांनी ही क्लिप समाजमाध्यमांवर टाकली, असे लंके यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिले. 

टॅग्स :चित्रा वाघराष्ट्रवादी काँग्रेसपारनेर