सेना नगरसेविकेचा पती भाजपा उमेदवार
By Admin | Updated: October 4, 2014 01:26 IST2014-10-04T01:26:03+5:302014-10-04T01:26:03+5:30
प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे, असे म्हटले जात़े परंतु आता राजकारणातही सर्व काही क्षम्य असल्याचे बोलण्याची वेळ आली आह़े
सेना नगरसेविकेचा पती भाजपा उमेदवार
>मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे, असे म्हटले जात़े परंतु आता राजकारणातही सर्व काही क्षम्य असल्याचे बोलण्याची वेळ आली आह़े अंधेरी पूर्व येथील शिवसेना नगरसेविका यांचे पती चक्क भाजपातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ युती तुटल्यामुळे काँग्रेसपेक्षा भाजपाच शिवसेनेसाठी मोठा प्रतिस्पर्धी ठरत आह़े त्यामुळे प्रचार पतीचा की पक्षाचा अशा कोंडीत ही नगरसेविका सापडली आह़े
यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही जाऊ विरुद्ध जाऊ, नणंद विरुद्ध भावजय असे चित्र पाहायला मिळाले आह़े मात्र अंधेरी पूर्व मतदारसंघातून एका अर्थाने पती-पत्नीच एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत़ 2क्12 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपातून तिकीट मिळत नसल्याने सुनील यादव या भाजपाच्या पदाधिका:याने त्या वेळेस मित्रपक्ष शिवसेनेतून पत्नी संध्या यादवला उमेदवारी मिळवून दिली़ या तिकिटावर प्रभाग क्ऱ 71 मधून त्या निवडूनही आल्या़
स्थानिक माजी नगरसेवक रमेश लटके यांचे सुनील यादव यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने संध्याचा जोमाने प्रचार करीत तिला निवडून आणल्याचे समजत़े परंतु विधानसभेच्या जागा वाटपावरून सेना-भाजपात फिस्कटल़े त्यामुळे आतार्पयत दोन वेगळ्या पक्षांचा ङोंडा उचलूनही गुण्यागोविंदाने नांदणा:या यादव दाम्पत्यापुढेच पेच निर्माण झाला आह़े (प्रतिनिधी)
उत्सुकतेची लढत
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ शिवसेनेचे रमेश लटके, काँग्रेसचे सुरेश शेट्टी, राष्ट्रवादीचे अखिलेश सिंह, मनसेचे संदीप दळवी, बसपाचे राहुल कांबळे असे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत़ मात्र लटके आणि यादव यांच्या लढतीविषयी खास उत्सुकता लोकांमध्ये आह़े