पुस्तकाचा वाढदिवस साजरा करावा
By Admin | Updated: November 29, 2014 00:39 IST2014-11-29T00:39:55+5:302014-11-29T00:39:55+5:30
कार्ल मार्क्स यांच्या ‘दास कॉपिटल’ या ग्रंथाच्या अखेरच्या आवृत्तीच्या प्रकाशनदिनी या ग्रंथाचा वाढदिवस साजरा होतो.

पुस्तकाचा वाढदिवस साजरा करावा
मुंबई : कार्ल मार्क्स यांच्या ‘दास कॉपिटल’ या ग्रंथाच्या अखेरच्या आवृत्तीच्या प्रकाशनदिनी या ग्रंथाचा वाढदिवस साजरा होतो. त्याचप्रमाणो भारतीय समाजात देखील अशाच प्रकारे ग्रंथांचे वाढदिवस साजरे व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण निरीक्षक दक्षिण विभागाच्या वतीने परळ येथील सोशल सव्र्हिस लीग शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या समारोपाच्या भाषणात ते बोलत होते. महाराष्ट्रीयन लोक पुस्तकावर अधिक खर्च करत नाहीत. परंतू पश्चिम बंगालमधील लोक अधिक वाचतात. ही संस्कृती वाढविण्यासाठी विद्याथ्र्याना शालेय वयापासूनच वाचनाची गोडी लावली पाहिजे. शिक्षणाबरोबरच विद्याथ्र्याचा बौद्धिक विकास महत्वाचा असतो, असेही मोरे म्हणाले. आपण मुलांना अभ्यासासंबंधी वाचण्यास सांगतो. घोकमपट्टी करुन यश मिळविणारे विद्यार्थी आयुष्यात मोठे होत नाहीत. त्यामुळे अभ्यासाबाहेर जाऊन पुस्तके वाचल्यास विद्याथ्र्याना प्रश्न विचारण्याची सवय लागते. त्यामुळे असे ग्रंथोत्सव झाले पाहिजेत, असेही मोरे यांनी सांगितले. यावेळी वसई विरार महापालिकेच्या उपायुक्त व साहित्यिका संगिता धायगुडे यांनी वाचनामुळे आपल्या जीवनाला कशी कलाटणी मिळाली, याचे कथन केले. ग्रंथमहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात काव्यतरंग या संगीतमय कार्यक्रमाने झाली. (प्रतिनिधी)
च्या कार्यक्रमात ग्रंथतुला हा कार्यक्रम पार पडला. सोशल सव्र्हिस लीग संस्थेचे विश्वस्त बाळ सडवेलकर, डॉ जहिर काझी, आणि माजी शिक्षक आमदार संजिवनी रायकर यांच्या ग्रंथतुला करण्यात आल्या.
च्लाखो रुपयांची झालेली पुस्तकखरेदीही या ग्रंथमहोत्सवाचे वैशिष्टय ठरले.