५१४ प्रजातींचे पक्षी
By Admin | Updated: November 26, 2015 02:50 IST2015-11-26T02:50:29+5:302015-11-26T02:50:29+5:30
बीएनएचएसकडून १५ नोव्हेंबर रोजी देशभरात करण्यात आलेल्या पक्षीगणनेत ५१४ प्रजातींच्या १५ हजार ६३८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे

५१४ प्रजातींचे पक्षी
मुंबई : बीएनएचएसकडून १५ नोव्हेंबर रोजी देशभरात करण्यात आलेल्या पक्षीगणनेत ५१४ प्रजातींच्या १५ हजार ६३८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल १५ वर्षांनी बीएनएचएसतर्फे ही पक्षीगणना करण्यात आली आहे. या पक्षीगणनेत संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत असलेले पांढऱ्या पाठीचे गिधाड, काळ्या पोटाचा सुरय, पांढरे गिधाड, मोठा जलरंक आणि नेपाळी गरुड या पक्ष्यांचीही नोंद करण्यात आली आहे.
१२ नोव्हेंबर हा पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचा स्मृतिदिन असतो. या निमित्ताने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि ‘बर्ड काऊंट इंडिया’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १५ नोव्हेंबर रोजी देशभरात पक्षीगणनेचे आयोजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी इंटरनॅशल युनियन फॉर कन्झर्वेशन आॅफ नेचर या संस्थेने भारतातील धोक्यात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या आठने वाढून ती १८० झाल्याची नोंद केली होती. बीएनएचएसच्या पक्षीगणनेत यातील ३० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाल्याचे संस्थेच्या अहवालात आवर्जून नमुद केले आहे. (प्रतिनिधी)