बाबा आढाव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: March 26, 2015 00:49 IST2015-03-26T00:49:06+5:302015-03-26T00:49:06+5:30
महात्मा फुलेंसारख्या अनेक विभूतींनी पुरोगामी विचाराचा वारसा दिलेल्या या राज्यात महाराष्ट्र कुठे चालला आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो आहे,

बाबा आढाव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
मुंबई : महात्मा फुलेंसारख्या अनेक विभूतींनी पुरोगामी विचाराचा वारसा दिलेल्या या राज्यात महाराष्ट्र कुठे चालला आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो आहे, अशी खंत हमाल पंचायतचे प्रणेते, ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांनी मांडली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने परळच्या महात्मा गांधी सभागृहात कामगार महर्षी गं.द. आंबेकर जीवन व श्रम गौरव प्रदान सोहळा पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबा आढाव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तीस हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी आपल्या मनोगतात डॉ. आढाव यांनी शेतकरी आणि गिरणी कामगारांच्या व्यथा मांडल्या.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांबाबत ३० मार्च रोजी विधानसभेवर शेतकरी व कामगारांचा लाँग मार्च काढून सरकारला जाब विचारला जाईल असे म्हटले. (प्रतिनिधी)