राठोड यांच्या घरात सापडले कोट्यवधीचे घबाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:05 IST2021-05-26T04:05:57+5:302021-05-26T04:05:57+5:30
मुंबई : घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या आरे दुग्ध डेअरीचे मुख्य ...

राठोड यांच्या घरात सापडले कोट्यवधीचे घबाड
मुंबई : घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या आरे दुग्ध डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू विठ्ठल राठोड (४२) यांच्या घरातून ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बेकायदा जमविलेल्या रकमेबाबत एसीबी अधिक तपास करत आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी घर दुरुस्तीसाठी राठोड यांच्याकडे अर्ज करत भेट घेतली. राठोड यांच्याकडे गोरेगाव दुग्धवसाहत तथा उपायुक्त प्रशासन याचा अतिरिक्त कार्यभारही आहे. तेव्हा राठोड यांनी शिपाई अरविंद तिवारी यास भेटण्यास सांगितले. तेव्हा तिवारीने अर्जदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतली. सोमवारी एसीबीने सापळा रचून तिवारीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यात दोघांचा सहभाग स्पष्ट होताच, त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी एसीबीने राठोड यांच्या घरी झाडाझडती घेतली. त्यांच्या घरातून ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड आढळली आहे.