बिहार निकालाचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्ससह रुपयाही गडगडला
By Admin | Updated: November 9, 2015 10:11 IST2015-11-09T10:08:40+5:302015-11-09T10:11:38+5:30
बिहार निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या दारूण पराभवाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून सोमवारी बाजार उघडतानाच सेन्सेक्स तसेच रुपयाची किंमत घसरली.

बिहार निकालाचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्ससह रुपयाही गडगडला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बिहार निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या दारूण पराभवाचा परिणाम शेअर बाजारावरही झाला असून सोमवारी बाजार उघडतानाच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६०८ अंकांनी कोसळून २६ हजार च्या खाली गेला. निवडणुकीच्या निकालाचा परिणामम रुपयावरही झाला असून डॉलरच्या तुलनेत रुपया ७४ पैशांनी कोसळून त्याची किंमत ६६.५० इतकी झाली आहे. सेन्सेक्सप्रमाणेचे निफ्टीतही पडझड झाली असून तो ७,८०० च्या खाली पोहोचला आहे.
बिहार निवडणुकीत भाजपाच्या पराभवामुळे बाजारात पडझड होण्याचा अंदाज तज्ञांनी आधीच वर्तवला होता, मात्र बाजार एवढा कोसळेल याचा अंदाज कोणालाच नव्हता. मात्र असे असले तरीही घसरणीचा हा ट्रेंड फार दिवस चालणार नसल्याचे मतही तज्ञांनी नोंदवले आहे.